yuva MAharashtra माळवाडी ता.पलूस येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष "शरदचंद्रजी पवार" (साहेब ) यांच्या ८१ व्या वाढदिवसाच्या निमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न...

माळवाडी ता.पलूस येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष "शरदचंद्रजी पवार" (साहेब ) यांच्या ८१ व्या वाढदिवसाच्या निमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न...



माळवाडी ता.पलूस येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष "शरदचंद्रजी पवार" (साहेब ) यांच्या ८१ व्या वाढदिवसाच्या निमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न...

-------------------------------------------------------------------

संपादक - भाऊसाहेब रुपटक्के
--------------------------------------------------------------------

भिलवडी | दि. 19/12/2021

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष "शरदचंद्रजी पवार" (साहेब )यांच्या ८१ व्या वाढदिवसाच्या निमित्त पदवीधर आमदार मा.अरुण अण्णा लाड व मा. शरद भाऊ लाड ,गटनेते जि. प सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माळवाडी,भिलवडी यांच्या सहकार्याने रविवार दि.१९ डिसेंबर २०२१ रोजी भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी माळवाडी, भिलवडी येथील ग्रामस्थ, बंधू, भगिनीच्या सहकार्याने जवळजवळ 52 रक्तदात्यांनी रक्तदान करून सहकार्य केले. संयोजकांनी रक्तदान केलेल्या सर्व रक्तदात्यांचे आभार मानले.

                             
                                            यावेळी पलूस तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष मोहन पाटील सर, सुदाम बाबर, विजय साळुंखे, राजू रुपटक्के, सौरभ पाटील, उमेश पाटील,अजय वायदंडे, रोहित मोहिते, सागर गायकवाड, ग्रा. पंं. सदस्या  अश्विनी अमोल साळुंखे व सर्व ग्रामस्थ तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


-----------------------------------------------------------------