तासगाव येथे सुरू असलेले " शिवार कृषी प्रदर्शन " ....
दिड टन वजनाचा रेडा पाहण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी....
------------------------------------------------------------------
तासगाव | दि.१८ डिसेंबर २०२१
स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि क्रांतिसिंह नाना पाटील बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सांगली जिल्ह्यातील तासगाव येथील दत्त माळ येथे सलग आठव्या वर्षी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महेश खराडे यांनी एक पाऊल पुढे टाकत शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान मिळावे शेतात पिकवलेली पीक विकता कसे येईल या हेतूने १६ डिसेंबर ते २० डिसेंबर या कालावधीत " शिवार कृषी प्रदर्शन " आयोजित केले आहे. या प्रदर्शनाला कालपासून महणजेच 16 डिसेंबरपासून सुरुवात झाली आहे.
प्रदर्शनाचे उद्घाटन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक व शेतकऱ्यांचे नेते खासदार राजू शेट्टी यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते झाले आहे.
दिनांक 17 डिसेंबर रोजी या कृषी प्रदर्शनामध्ये डॉग शोचे आयोजन केले होते. तर आज पशु प्रदर्शन चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये खिल्लार जातीच्या गाई , खिलार बैल , काजळी बैल , होस्टन जातीच्या गाई , होस्टन जातीचे बैल , मुरा जातिचा रेडा , मुरा जातीची म्हैस , यासह जनावरांच्या सर्व जातीचे पशु या प्रदर्शनात दाखल झाले होते.
या प्रदर्शनात मंगसुळीचे विलास नाईक यांचा दीड टन वजनाचा रेडा खास आकर्षण ठरला. यावेळी तासगाव तालुक्यासह इतर भागातील शेतकरी पशु प्रदर्शन पाहण्यासाठी मोठ्या संख्येने आले होते.
-----------------------------------------------------------------