पावसाने वाळवा नागठाणे रस्त्यावर आशिष विजय मगदूम या तरुण - शेतकऱ्याची कापणीला तयार असलेली दिड एकर द्राक्षबाग जमीनदोस्त....
सामान्य शेतकरी मगदूम यांचे सुमारे पंधरा लाख रुपयांचे नुकसान...
वाळवा | दि. 02 / 12 / 2021
सांगली जिल्ह्यासह वाळवा तालुक्यात काल रात्रीपासून पडणाऱ्या एकसारख्या पावसाने शेती आणि पिकाची मोठी हानी झाली आहे. वाळवा परिसरात पिक छाटणी झालेल्या चार हजार एकरातील द्राक्ष पिक हातचे जाण्याची चिन्हे आहेत. पावसाने वाळवा नागठाणे रस्त्यावर आशिष विजय मगदूम या तरुण - शेतकऱ्याची कापणीला तयार असलेली दिड एकर द्राक्षबाग कोसळली.
यात मगदूम यांचे सुमारे पंधरा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. गावकामगार तलाठी साहेबराव सुदेवाड यांनी पंचनामा केला. आशिष मगदूम यांनी चुलते रवींद्र अण्णा मगदूम यांची शेती कसण्यासाठी घेतली आहे. या जमीनीत शरद सोनाक्का जातीची दिड एकर द्राक्षबाग आहे.
अवकाळीच्या धास्तीने आशिष मगदूम यांनी या क्षेत्रात आगाप छाटणी घेतली होती. बागेत द्राक्षे लगडली होती. काल रात्रभर झालेल्या पावसाने मगदूम यांची द्राक्षबाग पुर्णपणे कोसळली. या बागेत सुमारे पंधरा टन उत्पादनाचा अंदाज होता. प्रति चार किलो पाचशे रुपयांप्रमाणे या द्राक्षाचा व्यवहार झाला होता. दोन दिवसात कापणीला सुरूवात करण्यात येणार होती. तोवर पावसाने सगळी द्राक्षबाग कोसळली.