'काळ्या ढगांच्या सोनेरी कडा' आत्मचरित्राचे प्रकाशन...
ठाणे / कल्याण - 04/12/2021
आशा रणखांबे
शारदा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ज्येष्ठ पत्रकार ,लेखक अनंत केशव देशपांडे लिखित " काळ्या ढगांच्या सोनेरी कडा " ह्या आत्मचरित्राचे प्रकाशन रविवार दिनांक ५ डिसेंबर २०२१ , रोजी सायं. ५.०० वाजता राजे संभाजी सभागृह, १ला मजला , अरुणोदय नगर , मुलुंड ( पूर्व ) येथे संपन्न होणार असून
ज्येष्ठ लेखिका डॉ. पुष्पलता धुरी ह्या अध्यक्षस्थानी असणार आहेत.तसेच डॉ. मृण्मयी देशपांडे, कवी राजेश साबळे- ओतुरकर ( अध्यक्ष, नीलपुष्प साहित्य मंडळ ), कवयित्री नंदा कोकाटे ( उपाध्यक्षा ,नीलपुष्प साहित्य मंडळ) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.