माधवनगर : युनियन बँक ऑफ इंडिया तर्फ "मुद्रा" योजने अंतर्गत कर्ज वितरण सोहळ्याचे आयोजन...
सांगली / दि. 0 8 डिसेंबर 2021
सांगली : माधवनगर येथील युनियन बँक ऑफ इंडिया कोल्हापूर विभागातर्फे सांगली क्लस्टर मधील होतकरू व गरजू अश्या छोट्या व्यापाऱ्यांना मुद्रा योजनेअंतर्गत आज दि. 8 डिसेंबर 2021 रोजी कर्ज वितरण मेळावा यशस्वीरित्या संपन्न झाला.
सदर कर्ज वितरण मेळाव्यास कोल्हापूर विभागाचे क्षेत्र प्रमुख श्री. टी. व्ही. रामानंद हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सदर मेळाव्यामध्ये 13 शाखांच्या 32 कर्जदारांना रुपये एक कोटी साठ लाखाचे कर्ज मंजुरी पत्र देण्यात आले.
यावेळी कर्जदारांनी बँकेच्या प्रति त्यांच्या असणाऱ्या भावना स्पष्ट केल्या व युनियन बँक ऑफ इंडियाचे आभार मानले. यानंतर प्रमुख पाहुणे श्री. टी. व्ही. रामानंद यांनी कर्जदारांना मार्गदर्शन केले व कर्जाची परतफेड नियमित करून बँकेला सहाय्य करावे असे आवाहन केले.
सदर कर्ज मेळाव्यास शाखाप्रमुख श्री. विवेक रांजन (मार्केटयार्ड शाखा) , श्री. संदीप घुले (यु एस के मिरज शाखा) , श्री विश्वास पाटील (सांगली मुख्य शाखा) , श्री. राजेश जाधव (फोर्ट रोड मिरज शाखा) , श्री. किरण सराटे (ईसीबी मिरज शाखा) , श्री. सदानंद चालीगंजेवार (शिवाजीनगर सांगली शाखा) , श्री. दिपेश तिवारी (जयसिंगपूर शाखा) , श्री. मदन पोळ (सिव्हिल हॉस्पिटल सांगली शाखा) , श्री. अमोल खोत (माधवनगर शाखा) , श्री. प्रशांत लंगडे (कसबे डिग्रज शाखा) , श्री. ज्योतिर्लिंग कपने (सोनी शाखा) , श्री. रेड्डी सर (विश्रामबाग शाखा) , श्री. शितल पाटील (सावळी शाखा) , सौ. रुपाली आंबेकर (अंकली शाखा) उपस्थित होते.
सदर मेळाव्याचे नियोजन श्री. पराग मेघरे , श्री. रणजीत पाटील , श्री. आशिष सावंत , सौ. अनघा ताम्हणकर , श्री. केदार शेटे , श्रीमती दिपाली पाटील , श्री. अजय शेळके व श्री दीपक मोहिते यांनी केले.
रिपोर्टिंग - दिलावरभाई शमनजी (सांगली)