भिलवडी येथील शेतकर्यांनी एकरकमी एफ आर पी मिळावी या मागणीसाठी एल्गार मोर्चा काढून आंदोलनाला केली सुरुवात...
भिलवडी सह सोळा गावातील शेतकऱ्यांनी एकरकमी एफ आर पी मिळणे बाबत ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत घेतले ठराव...
-------------------------------------------------------------------
-------------------------------------------------------–----------
भिलवडी | दि. ९ डिसेंबर२०२१
ऊसाला एकरकमी एफ आर पी मिळावी या मागणीसाठी भिलवडी सह सोळा ग्रामपंचायतीनी ठराव करून भिलवडी सह परिसरातील शेतकऱ्यांनी भिलवडी येथे दि.९ डिसेंबर रोजी एल्गार मोर्चा काढून आंदोलन सुरू केले.
भिलवडी,अंकलखोप,धनगाव,
माळवाडी, खंडोबाचीवाडी,
चोपडेवाडी,सुखवाडी, हजारवाडी,संतगाव,सूर्यगाव,
नागठाणे,खटाव,ब्रम्हनाळ,वसगडे, बुरुंगवाडी,भिलवडी स्टेशन आदी गावातील शेतकऱ्यांनी ऊसाला एकरकमी एफ आर पी मिळावी यासाठी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत ठराव घेतले आहेत.
सदर ठरावासह एकरकमी एफ आर.पी.बाबत सांगली जिल्हाधिकाऱ्यांकडे सदर मागणीचे निवेदन देण्यात आले.
वाढत्या महागाई मुळे ऊस शेती तोट्याची बनली आहे,वारंवार येणाऱ्या महापूर व अवकाळी पावसाच्या संकटामुळे कृष्णाकाठचा शेतकरी दुहेरी संकटात आहे.तेव्हा सांगली जिल्ह्यातील कारखानदारांनी आमच्या मागण्यांची दखल घेऊन एकरकमी एफ आर पी द्यावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा बी.डी.पाटील यांनी दिला.
उसाला प्रतिटन चार हजार पेक्षा जादा दर देणे कारखानदारांना शक्य असताना ते कमी दर देतात.त्याचे ही बिल तीन तुकड्यात देऊन ऊस उत्पादकांची थट्टा सुरू ठेवली असून लवकरात लवकर या प्रश्नावर शासनाने तोडगा काढून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी धनगावचे सरपंच सतपाल साळुंखे यांनी केली.
यावेळी भिलवडीचे माजी सरपंच शहाजी गुरव,बाळासाहेब मोहिते,चंद्रकांत पाटील,रमेश पाटील,शशिकांत यादव,कपिल शेटे,सचिन देसाई,दिपक पाटील,
धनंजय पाटील,बाळासाहेब महिंद,अमोल वंडे,राहुल कांबळे,कृष्णात यादव आदींसह शेतकरी उपस्थित होते.