भिलवडी : सेकंडरी स्कूलचे निबंध स्पर्धेत घवघवीत यश...
-------------------------------------------------------------------
भिलवडी | दि. 27 डिसेंबर 2021
भिलवडी : विधी व सेवा प्राधिकरण सांगलीचे वतीने आझादी का अमृत महोत्सव निमित्त २आक्टोंबर ते १४ नोव्हेंबर दरम्यान घेण्यात आलेल्या निबंध, घोषवाक्य, चित्रकला स्पर्धेत पलूस तालुक्यातील भिलवडी येथील सेकंडरी स्कूल अँण्ड ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थीनींनी घवघवीत यश संपादन केले.
निबंध स्पर्धेत कु. सुखदा भोळे हिने प्रथम क्रमांक पटकाविला. तिला प्रशस्तीपत्र व रोख रक्कम रू. २०००,द्वितीय क्रमांक कु. अंकिता कुकडे प्रशस्तीपत्र व रू. ५००, तृतीय क्रमांक कु. अदिती माने, सानिया इनामदार प्रशस्तीपत्र व रू १२५ मिळाले.
या सर्व यशस्वी विद्यार्थीनींनीचा मुख्याध्यापिका शुभांगी मन्वाचार, उपमुख्याध्यापक एस. एन कुलकर्णी, पर्यवेक्षक संभाजी माने यांच्या हस्ते पुष्प देवून सत्कार करण्यात आला. यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●