भिलवडी येथील आजी-माजी सैनिक संघटनेच्या वतीने १६ डिसेंबर " विजयी दिवस " साजरा...
१९७१ च्या भारत-पाकिस्तान युध्दात प्रत्यक्ष सहभाग असलेल्या जाँबाज सैनिकांचा गौरव-सन्मान...
-------------------------------------------------------------------
संपादक - भाऊसाहेब रुपटक्के
-------------------------------------------------------------------भिलवडी | दि. 17/12/2021
१९७१ मध्ये झालेल्या भारत-पाकिस्तानच्या युध्दाला गुरुवार दिनांक १६ डिसेंबर रोजी ५० वर्षे पूर्ण होत आहेत त्यानिमित्ताने या युद्धामध्ये सहभागी झालेल्या कृष्णाकाठच्या शूरवीर सैनिकांचा " गौरव सन्मान " कार्यक्रम भिलवडी येथील आजी-माजी सैनिक संघटना भिलवडी , भारतीय स्टेट बँक शाखा भिलवडी व साने गुरुजी संस्कार केंद्र भिलवडी यांच्या संयुक्त विद्यमानाने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
१९७१ सालच्या भारत पाकिस्तान युद्धा मध्ये भिलवडी गावातील सुमारे ५५ ते ६० जाँबाज सैनिकांनी सहभाग घेतला होता. यातील मुबारक चॉंद पठाण व युसुफ गुलाब पठाण यांनी तर पाकिस्तान विरुद्ध लढणारच म्हणून चंग बांधला होता या योद्ध्यांना ऑल इंटर योद्धे असे देखील संबोधले जाते. सैन्यात कार्यरत असणारे परंतु सुट्टीवर आल्यानंतर लग्न बंधनात बांधले गेलेले नवविवाहित शंकर पांडुरंग वावरे यांनी देखील अंगाची हळद देखील निघाली नसताना, ताबडतोब देशरक्षणासाठी पाकिस्तान विरुद्ध लढाई करण्यासाठी जाण्याचा निर्णय घेतला . तसेच बाबासाहेब राजाराम टकले यांनी देखील या युद्धामध्ये उल्लेखनीय भुमिका बजावली होती. अशा या देशसेवेसाठी योगदान दिलेल्या माजी सैनिकांच्या प्रति आदर म्हणून भिलवडी येथील आजी माजी सैनिक संघटना, भारतीय स्टेट बँक भिलवडी शाखा व साने गुरुजी संस्कार केंद्राच्या वतीने शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन १७ शुरवीर जाँबाज माजी सैनिकांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी भिलवडी येथील आजी-माजी सैनिक संघटना , भारतीय स्टेट बँक शाखा भिलवडी , व सानेगुरुजी संस्कार केंद्राच्या वतीने १६ डिसेंबर " विजयी दिवस " त्याचबरोबर
१९७१ च्या भारत-पाकिस्तान युध्दात प्रत्यक्ष सहभाग असलेल्या जाँबाज सैनिकांचा गौरव-सन्मान व CDS जनरल बिपिन राऊत व त्यांची पत्नी मधुलिका राऊत सह हेलिकॉप्टर दुर्घटनेतील सर्व शहिद जवानांना श्रध्दांजली वाहण्यात आली.
यावेळी भिलवडी येथील आजी माजी सैनिक , भारतीय स्टेट बँकेचे शाखाधिकारी योगेश राऊत, सांगली जिल्हा सैनिक कल्याण सहाय्यक अधिकारी चंद्रकांत फाटक , साने गुरुजी संस्कार केंद्राचे सुभाष कवडे , संघटनेचे अध्यक्ष कुमार पाटील , उपाध्यक्ष प्रकाश चौगुले सह नागरिक उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले तर युध्दात प्रत्यक्ष सहभागी असलेल्या काही सैनिकांनी रणभूमीवरील आठवणींना उजाळा दिला.
उपस्थितांचे स्वागत , प्रास्ताविक तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघटनेचे सचिव जी.के.शेख यांनी केले.
-----------------------------------------------------------------