yuva MAharashtra इस्लामपूर येथे राष्ट्रीय अपंग विकास महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने " जागतिक दिव्यांग दिन " मोठ्या उत्साहात साजरा...

इस्लामपूर येथे राष्ट्रीय अपंग विकास महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने " जागतिक दिव्यांग दिन " मोठ्या उत्साहात साजरा...



इस्लामपूर येथे अपंग विकास महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने " जागतिक दिव्यांग दिन " मोठ्या उत्साहात साजरा...

👇 VIDEO 👇




इस्लामपूर | दि. ०७ डिसेंबर २०२१

इस्लामपूर ता. वाळवा येथे 6 डिसेंबर रोजी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय अपंग विकास महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जागतिक दिव्यांग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.



या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाळवा पंचायत समितीच्या सभापती सौ. शुभांगी (ताई) पाटील या होत्या. व प्रमुख पाहुणे मा. कृष्णात पिंगळे (उपविभागीय पोलीस उपाधीक्षक इस्लामपूर-वाळवा) हे होते.
यावेळी प्रमुख उपस्थिती वाळवा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी - डॉ. आबासाहेब पवार , उपसभापती पंचायत समिती वाळवा - नेताजी पाटील , माजी जिल्हा परिषद अध्यक्ष - देवराज पाटील (दादा) , सहाय्यक गटविकास अधिकारी अजिंक्य कुंभार हे उपस्थित होते.


कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले व स्वागतगीत अंध गायक महेश नवाळे यांनी सादर केले.

यावेळी दिव्यांग असून सुद्धा दिव्यांग तत्त्वावर मात करून समाजातील गोरगरिबांना मदत करणाऱ्या महिला ग्रामपंचायत सदस्या कविता पाटील यांना दिव्यांग मित्र पुरस्काराने गौरवण्यात आले.

कलेक्टर ऑफिस येथील अंकुर यादव हे दिव्यांग असून महाराष्ट्रातील अतिउच्च कळसुबाई शिखर सर केल्याबद्दल व दिव्यांगांचे कार्य केल्याबद्दल त्यांना समाज मित्र पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
कोरोना काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून दिव्यांगांसाठी काम केल्याबद्दल सौ. मीना रावते व विजय केंगार यांना कोरोना योद्धा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
" माणुसकीचे नाते " या  फाउंडेशन च्या वतीने नंदू माळी या दिव्यांग बांधवाला ट्रायसिकल  देण्यात आली.
 यावेळी राष्ट्रवादी महिला इस्लामपूर शहर उपाध्यक्षा व समाजसेविका सौ. प्रतिभा पाटील यांनी शालेय मुलांना वह्यांचे वाटप केले.


 हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय अपंग विकास महासंघाचे विभागीय अध्यक्ष श्री. प्रकाश पवार , सांगली जिल्हा अध्यक्ष संभाजी ठोंबरे , तालुका अध्यक्ष दीपक माळी , जिल्हा सदस्य संभाजी घेऊदे , प्रहार चे माजी अध्यक्ष तुकाराम पवार यांनी प्रयत्न केले.
 या कार्यक्रमाला दत्ता पाटील पलूस अध्यक्ष, बाळकृष्ण पवार, सर्जेराव शिंदे, संतोष सावंत, सौ. संगीता पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस दिव्यांग सेल तुंग अध्यक्ष प्रवीण पांढरे, कसबे डिग्रज राष्ट्रवादी दिव्यांग सेल अध्यक्ष श्रीरंग यादव, रघुनाथ मोहिते, राजू जाधव, शासकीय दिव्यांग कर्मचारी जिल्हा उपाध्यक्ष व ब्रम्हनाथ बनसोडे प्रहार संघटना आदींसह दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने  उपस्थित होते.
 यावेळी दिव्यांगाना कोणतीही मदत केव्हांही द्यायला तयार आहे असे भाषणात मा. कृष्णात पिंगळे (उपविभागीय पोलीस उपाधीक्षक) यांनी सांगितले. तर पंचायत समितीकडे असणाऱ्या सर्व योजना तळागाळातील दिव्यांग बांधवांच्या पर्यंत पोहोचवु असे गटविकास अधिकारी आबासाहेब पवार यांनी सांगितले.

मान्यवरांचे व उपस्थितांचे स्वागत राष्ट्रीय अपंग विकास महासंघाचे विभागीय अध्यक्ष श्री. प्रकाश पवार यांनी केले. कार्यक्रमाचे   प्रास्ताविक श्री संभाजी ठोंबरे यांनी केले व सूत्रसंचालन तेजस्विता ठोंबरे व सीमा भोसले यांनी केले व शेवटी  मान्यवरांचे व सर्व उपस्थितांचे आभार   शासकीय कर्मचारी संघटना अध्यक्ष राजू जाधव, शिराळा यांनी मानले.
 या कार्यक्रमासाठी शिक्षक नेते उत्तम पाटील, माणुसकीचे नाते फाउंडेशन , शिवसमर्थ मल्टीस्टेट ऑपरेटिव सोसायटी तळमावले यांचे विशेष सहकार्य लाभले.