भिलवडी साखरवाडी येथे 2022 या नववर्षा निमित्त ओबीसी संघटनेच्या वतीने वृक्षारोपण....
-------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------
भिलवडी | दि. 01 जानेवारी 2022
भिलवडी तालुका पलूस येथे आज नवीन वर्षाचे औचित्य साधून भिलवडी-साखरवाडी येथे नव्यानेच स्थापन केलेल्या ओबीसी संघटनेच्या वतीने वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
नव्याने स्थापन केलेल्या ओबीसी संघटनेचा विस्तार निसर्गातील वृक्षाप्रमाणे वाढावा. व संघटना मजबूत व्हावी या दृष्टिकोनातून आज भिलवडी-साखरवाडी येथे नवीन वर्षाचे औचित्य साधून वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केला असल्याचे संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
आजी माजी सैनिक संघटना भिलवडी अध्यक्ष कुमार बापू पाटील , उपाध्यक्ष प्रकाश चौगुले व आजी माजी सैनिक संघटनेतील सर्व पदाधिकारी व ओबीसी संघटना पलूस तालुका अध्यक्ष महेश सुतार , बांबवडे शहर अध्यक्ष नागनाथ सुतार यांच्या हस्ते वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन करुन साखरवाडी येथील शाळेच्या परिसरात वेगवेगळ्या प्रकारचे झाडे लावण्यात आली.
यावेळी बोलताना ओबीसी संघटना भिलवडी अध्यक्ष राजेंद्र तेली म्हणाले की.. सरकारने ओबीसींचे काडून घेतलेले आरक्षण तात्काळ द्यावे. त्याच बरोबर आमच्या पलूस-कडेगाव मतदार संघातून ओबीसींचा आवाज सरकार दरबारी उठवण्यासाठी कोणीच प्रतिनिधी नसल्यामुळे आम्ही येणाऱ्या काळात आमच्या या संघटनेच्या माध्यमातून ओबीसी आरक्षणाचा मुद्दा घेऊन मोठा लढा उभा करणार आहोत. त्याच बरोबर भिलवडी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच तानाजी भोई यांनी देखील आपल्या मनोगतातून ओबीसी आरक्षणाचा मुद्दा मांडला. त्याच बरोबर यावेळी बोलताना आजी माजी सैनिक संघटना ओबीसी आरक्षणाच्या लढ्यात सदैव तुमच्या सोबत राहील असे कुमार बापू पाटील म्हणाले.
यावेळी आजी माजी सैनिक संघटनेतील सर्व पदाधिकारी , ओबीसी संघटना पलूस तालुका अध्यक्ष - महेश सुतार , बांबवडे शहराध्यक्ष नागनाथ सुतार , ओबीसी संघटना भिलवडी शहराध्यक्ष - राजेंद्र तेली , उपाध्यक्ष पाशा आत्तार , उपाध्यक्ष - मारुती शिंदे , सचिव सुभाष गायकवाड , खजिनदार - उत्तम भोई , युवक अध्यक्ष - शैलेंद्र कुंभार , उपाध्यक्ष- प्रथमेश धोत्रे व मोसींन फकीर , सचिव - अख्तर सुतार व भिलवडी येथील ओबीसी संघटनेतील सर्व कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●