रेल्वे स्थानकास अण्णाभाऊ साठे यांचे नाव द्या डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाची मागणी; सोलापुरात आंदोलन...
------------------------------------------------------
संपादक - भाऊसाहेब रुपटक्के
-------------------------------------------------------------------
सोलापूर | दि. ३ जानेवारी २०२२
सोलापूर रेल्वे स्थानकास साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्यात यावे या मागणीसाठी शौर्य दिनाचे औचित्य साधून शहरातील डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधण्यात आले.
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये मोलाचे योगदान असणारे आणि शिवरायांचे पोवाडे सातासमुद्रापार पोहोचविणारे लोकशाहीर, कष्टकरी व बहुजन जनतेच्या दैनंदिन जगण्याचे वास्तव आपल्या लेखनीतून मांडणारे साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांचे नाव सोलापूर रेल्वे स्थानकास द्यावे ही मागणी मागील दहा वर्षापूर्वीपासून मातंग समाजाची, साहित्यप्रेमी व शिवप्रेमींची आहे. पण शासनाने या मागणीकडे कानडोळा केला आहे. शासनाने या मागणीचा विचार केला नाही तर आगामी काळात रेल रोको आंदोलन करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला.
यावेळी डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेश युवक अध्यक्ष सोहन लोंढे, युवक जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज मोरे, रोहित खिलारे आदींसह कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत रेल्वे स्थानक परिसरात आंदोलन करण्यात आले आहे. आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन सोडून दिले.
======================================