कोल्हापूर जिल्हा काँग्रेस सेवादल सचिव पदी श्री. सर्जेराव माळकर यांची निवड....
--------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------
कोल्हापूर | दि. 12 / 01 / 2022
कोल्हापूर जिल्हा काँग्रेस सेवादल सचिव पदी श्री. सर्जेराव माळकर (पेठ वडगाव) यांची निवड करण्यात आली. या निवडीचे पत्र आमदार राजू बाबा आवळे साहेब यांच्या हस्ते देण्यात आले. या निवडीबद्दल माजी सामाजिक न्याय मंत्री व माजी खासदार श्री जयवंतराव आवळे साहेब यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. या निवडीचे पत्र जिल्हा सेवादल अध्यक्ष श्री. आर. के. देवने यांनी दिले. या वेळी शिंपी समाज महाराष्ट्र अध्यक्ष श्री. विनायक तांदळे हे प्रमुख उपस्थित होते. यावेळी जिल्हा काँग्रेस सेवादल प्रवक्ते श्री. रणजीत सिंह पाटील , शिंपी समाजाचे नेते नितीन पेटकर, वडगाव शहर काँग्रेस अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष श्री. विकासराव कांबळे, वडगाव ज्येष्ठ नागरिक संघटना अध्यक्ष श्री. सूर्यकांत हजारे, श्री वैभव घोरपडे हे उपस्थित होते.
यावेळी आमदार राजू बाबा आवळे यांनी वडगाव व परिसरामध्ये काँग्रेस पक्षाचे काम श्री सर्जेराव माळकर यांनी जोमाने करावे असे आवाहन यावेळी त्यांनी केले.
नुतन जिल्हा सचिव श्री सर्जेराव माळकर यांनी वडगाव मध्ये काँग्रेस पक्ष तळागाळापर्यंत वाढवण्याचे कार्य करू असे सांगितले.
या निवडी साठी कोल्हापूर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष व पालक मंत्री नामदार श्री सतेज उर्फ बंटी पाटील साहेब, आमदार राजू बाबा आवळे साहेब, जिल्हा प्रवक्ते श्री रणजीत सिंह पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी आभार सूर्यकांत हजारे यांनी मानले.
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■