मिरज मधील शास्त्री चौक,पिरजादे प्लॉट,फातिमा मस्जिद पर्यंतच्या मालकी जागेवर घालण्यात आलेले आरक्षण रद्द करून नियमितीकरण करा अन्यथा तीव्र आंदोलन...
वंचित बहुजन आघाडीचा इशारा...
--------------------------------------------------------------------
सामान्य जनतेचा बुलंद आवाज....!
संपादक - भाऊसाहेब रुपटक्के
------------------------------------------------------
मिरज दि. १७/१/२०२२
मिरज शहरामधील शास्त्री चौक येथील पिरजादे प्लॉट ते फातिमा मस्जिद समोर पर्यंत गेले कित्येक वर्षांपासून लोकवस्ती आहे. येथील सर्व प्लॉट धारकांचे खरेदी दस्त सुद्धा आहेत, त्याच सोबत सर्व नागरी सुविधा सुद्धा आहेत तसेच आपल्या महानगरपालिका कडून आकारण्यात येणारे कर सुध्दा आकारण्यात येतात आणि हे आरक्षण उठवून प्लॉट धारकांना त्यांंचा अधिकार मिळावा म्हणून नियमितीकरण करण्यासाठी फाईल तयार करून सुद्धा बहुतांश लोकांनी महानगरपालिका मध्ये जमा केलेले आहे. तरी अद्यापही त्याबद्दल कोणताही नागरिकाच्या समर्थनार्थ निर्णय घेण्यात आलेला नाही.
मागील दोन वर्षापासून कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे करण्यात आलेले लॉकडाऊन मुळे छोटे-मोठे उद्योग व्यवसाय डबघाईला आले आहेत हे आपल्यापासून लपून राहिले नाही त्या डबघाईला जात असलेल्या व्यवसायाला स्थिर करण्यासाठी आर्थिक मदतीची गरज आहे आणि येथील छोटे मोठे व्यावसायिकांना त्यासाठी ह्या मिळकती शिवाय दुसरा पर्याय नसताना ह्या मिळकतीवर आरक्षण असल्याने त्यावर कर्ज घेता येत नाही(मंजूर होत नाही) हि मिळकत असताना त्याचा फायदा काय? लोकांनी जीवनाची पुंजी लावून घेतलेली ह्या मिळकतीचा फायदा होत नाही त्यामुळे आम्ही आपणास विनंती करतो कि
आरक्षण लवकर काढून नियमितीकरण करू द्यावे अन्यथा आम्ही वंचित बहुजन आघाडी कडून संविधानिक मार्गाने मागणी मान्य होई पर्यंत मोर्चे, निदर्शने, आंदोलने करू असा इशारा यावेळी देण्यात आला.
यावेळी वंचित बहुजन आघाडी सांगली जिल्हामहासचिव (दक्षिण) उमरफारूक ककमरी, उपाध्यक्ष चंद्रकांत खरात, मिरज शहर अध्यक्ष सतीश शिकलगार, रवी कांबळे आदी उपस्थित होते.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆