घरच्या मोलकरणीने केलेल्या चोरीचा इस्लामपुर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेने लावला तीन तासात छडा....
-------------------------------------------------------------------
इस्लामपूर : ६ जानेवारी २०२२
सांगली जिल्हा पोलीस अधिक्षक श्री. दिक्षीतकुमार गेडाम सो.व अप्पर पोलीस अधिक्षक सौ. मनिषा दुबुले मँडम यांनी चोरी , घरफोडी , जबरीचोरी अश्या प्रकारचे गंभीर गुन्हे उघडकिस आणणेबाबत सुचना दिल्या होत्या त्याप्रमाणे इस्लामपुर पोलीस ठाणे हद्दीत ताकारी रोडवरील के. एन. पी. नगर येथे राहत असणाऱ्या सौ. संगिता प्रकाश थरवल यांचे राहते घरी चोरीचा प्रकार घडला होता त्याबाबत इस्लामपुर पोलीस ठाणेस गुरन.०४/२०२२ भादविस ३८१ प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.
श्री. कृष्णात पिंगळे सो, उपविभागीय पोलीस अधिकारी इस्लामपूर विभाग इस्लामपूर यांचे मार्गदर्शनाखाली श्री. शशिंकात चव्हाण, पोलीस निरीक्षक इस्लामपुर पोलीस ठाणे, यांनी सदर गुन्हा उघडकिस आणणे कामी आदेश दिले होते. त्याप्रमाणे इस्लामपुर गुन्हे प्रकटिकरण शाखे कडील सपोनि प्रविण साळुंखे, पोहेकाँ दिपक ठोंबरे, पोना अरुण पाटील, पोशि आलमगीर लतिफ, पोशि सचिन सुतार, मपोहेकाँ मिनाक्षी माळी यांनी संशयीत महिला किसाबाई बाबुराव कदम वय ५६ वर्षे रा. निनाई नगर, इस्लामपुर हिला ताब्यात घेवून तिच्याकडे सखोल चौकशी केली असता तीने दि. ०३/०१/२०२२ रोजी सौ. संगीता थरवल यांचे घरी धुणे भांडी करणे कामी गेली असता सोन्याचा शाही हार चोरी केल्याची कबुली दिली आहे. १,४७,०००/-रु .किंमतीचा २ तोळे ७७० ग्रॅम वजनाचा एक सोन्याचा शाही हार तीच्या कडुन जप्त केला आहे. तसेच तीच्याकडुन आणखी काही गुन्हे उघडकिस होण्याची शक्यता आहे.