बाबासाहेब चितळे महाविद्यालयामध्ये क्रांतीज्योती
सवित्रीबाई फुलेंना अभिवादन ....
------------------------------------------------------------------
भिलवडी | दि. ३ जानेवारी २०२२
भिलवडी तालुका पलूस येथील बाबासाहेब चितळे महाविद्यालय व इतिहास विभागाच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त अभिवादन करणेत आले .
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . दीपक देशपांडे यांनी मनोगत व्यक्त केले ते म्हणाले की पुण्यासारख्या ठीकाणी फुले दापंत्यांनी भिडेवाड्यात क्रांती केली . सावित्रीबाई फुलेंनी समाजातील लोकांचा विरोध पत्करून शिक्षण घेतले आणि त्या शिक्षणाचा उपयोग स्रियांना शिक्षण देण्यासाठी केला त्यामुळे आज मुली शिक्षण घेत आहेत मोठ मोठ्या पदांवर विराजमान आहेत ही सर्व कृपा सावित्रीबाई फुलेंची आहे . परंपरेच्या रहाटगाडग्यात गुंतलेल्या स्रियांना बाहेर काढून त्यांना शिक्षण देवून शिक्षित करण्याचे काम सवित्रीबाई फुलेंनी केले आहे . त्यामुळे स्रियांचे सबलीकरण व सशक्तिकरण झाले आहे . त्यांनी केलेला त्याग हा जागतिक पातळीवर,चा आहे . अशा थोर सावित्रिबाईना मी वंदन करतो आणि सर्वांनी त्याच्यापासून प्रेरणा घ्यावी अशी विनंती करतो असे ते म्हणाले .
यावेळी महाविद्यालयातील प्रा. भारती पाटील , कला व विज्ञान विभागातील विद्यार्थीनींनी मनोगत व्यक्त केले . या कार्यक्रमाचे स्वागत डॉ. डी.पी खराडे यांनी केले ,सूत्रसंचालन प्रा . डॉ. कदम एस.डी. यांनी
केले तर आभार प्रा. ए .एन . केंगार यांनी मानले . या कार्यक्रमास कला, वाणिज्य , व विज्ञान विभागातील सर्व विद्यार्थी प्राध्यापक व शिक्षकेतर सेवकवर्ग उपस्थित होता