भिलवडी-साखरवाडी येथील एका युवकाला जबर मारहाण....
मारहाण करणाऱ्यां विरोधात भिलवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल....
--------------------------------------------------------------------
सामान्य जनतेचा बुलंद आवाज....!
संपादक - भाऊसाहेब रुपटक्के
---------------------------------------------------------------------
भिलवडी | दि. १९/०१/२०२२
भिलवडी साखरवाडी तालुका पलूस येथील एका सेंट्रींग काम करणार्या युवकाला घराची खिडकी व जागेच्या कारणावरून बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे.
भिलवडी पोलीस ठाणे यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार दि.१८/०१/२०२२ रोजी सायंकाळी ०७.०० वा. चे सुमारास भिलवडी-साखरवाडी गावातील तौफीक कादर फकीर वय ३५ वर्षे व्यवसाय-सेन्ट्रींग काम रा. साखरवाडी भिलवडी ता. पलुस यास तु तुझ्या घराचे दुस-या मजल्यावर खिडकी का काढली ती जागा आमची आहे असे म्हणून मारुती सिद्ध हराळे याने तौफीक कादर फकीर याचा हात पिरगळा व शिवीगाळ केली तसेच मोहन सय्याप्या हराळे याने पाठीमागुन धरले व अप्पा हराळे याने त्याची कॉलर धरून त्यास लाथाबुक्यांनी मारहाण करून त्याचे हातातील प्लस्टीकचे किटलीने त्याच्या डोकीत कपाळावर डावे बाजुस जोरात मारहाण करून त्यास जखमी केले आहे. त्याबाबत तौफिक कादर फकीर रा.साखरवाडी यांनी भिलवडी पोलिस ठाणेस फिर्याद दिली आहे.
सदर गुन्हयाचा तपास भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडग सो यांचे मार्गदर्शनाखाली मपोना मदने हे करीत आहेत.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆