yuva MAharashtra || आरोग्यम् धनसंपदा || खाली दिलेली माहिती वाचा आणि शेअर पण करा...

|| आरोग्यम् धनसंपदा || खाली दिलेली माहिती वाचा आणि शेअर पण करा...

          

            
         || आरोग्यम् धनसंपदा ||

 
खाली दिलेली माहिती वाचा आणि शेअर पण करा...

-------------------------------------------------------------------
         सामान्य जनतेचा बुलंद आवाज....!
संपादक - भाऊसाहेब रुपटक्के
--------------------------------------------------------------------


दि. १६ जानेवारी २०२२ 
 || आरोग्यम् धनसंपदा ||
[१]


ॲलोपॕथ औषधांवर अवलंबून राहण्यापेक्षा पूर्वजांनी सांगितलेल्या गोष्टी खाल्ल्या तर किती फायदा होईल याचा विचार जरूर करा आणि आजपासून पौष्टिक खाद्य सुरू करा.

गूळ + खोबरे = बुद्धीवर्धक
(म्हणून बाप्पाचा नैवेद्य)
गूळ + शेंगदाणे = शक्तिवर्धक
(म्हणूनच श्री हनुमानाचा नैवेद्य)
गूळ + फुटाणे = हिमोग्लोबींन वर्धक व रक्तशुद्धकारक म्हणून श्री बालाजीचा प्रसाद. 
तीळ + गूळ = कॅल्शियम, मॅग्नेशियम,आयर्न + झिंक + सेलेनियम 
(हृदयासाठी फायदेशीर आणि थंडीमध्ये शरीर गरम ठेवायला उपयोगी,)
(यातले सेलेनियम - कॅन्सर पेशींची वाढ रोखण्यास मदत करते)
 म्हणून संक्रांतीला गूळ पोळी
थंडीत बाजरीची तीळ लावलेली भाकरी  - शरीरात ऊर्जा (उष्णता) निर्माण करण्यासाठी
डिंकाचे लाडु किंवा राजगिरा लाडू
गुळतूप पोळी, शेगदाणा चिक्की किंवा भिजवलेले हरबरे - ताकत मिळण्यासाठी
उन्हाळ्यात नाचणीची अंबिल,ताक,मठ्ठा, लिंबु सरबत, आंबाडीचे व कोकम सरबत,सोलकडी इतर सरबते- शरीरात थंडावा निर्माण करुन दाह कमी करण्यासाठी
असे अनेक पदार्थ मिश्रणाचे केमिकल कंपोजिशन पाहिल्यास त्या शरीरासाठी फायदेशीर दिसतील...
आपल्याला फक्त सण साजरे करायला शिकवले जाते त्यामागचे सायन्स, त्याच वातावरणात तेच पदार्थ का खावेत? हे नाही शिकवले जातं,
कारण पूर्वीची मुले ...आई वडिलांनी सांगितले तर नक्कीचं ऐकत होती. फार चिकित्सा करण्याच्या भानगडीत पडत नव्हती. आज तसे नाही. असंख्य प्रश्न विचारून भंडावून सोडतात. आणखी एक कारण म्हणजे हे जर शिकवले तर मग bornvita कोण पिणार?
आपले पूर्वज, लढाऊ योद्धे तर bornvita, कॉम्प्लान पीत नव्हते ना?
मग त्यांच्यात कमजोरी,ताकद कमी होती का? 
अहो एक आपला मावळा ५० शत्रूंशी एकटा लढायचा...
कुठले व्हे - प्रोटीन, क्रिएटिन होते का तेव्हा ? 
शिवाय आपले पूर्वज एवढे हुशार होते, ज्यांनी अफाट शोध लावले, ते कुठले 'व्हिटॅमिन' , 'टॉनिक' पीत होते का ? किंवा त्यावर अवलंबून होते का ?

आपले पूर्वज हे सर्व देशी पदार्थ, नियमित नक्कीचं खात होते , आणि  म्हणूनचं आताच्या आपल्या पिढी पेक्षा त्यांच्यात ताकद जास्त होती... जास्त निरोगी होते ते आणि जास्त बुद्धिमान सुद्धा होते .अहो , वयाच्या १८-१९ वर्षी वागभट्टांचे संपूर्ण आयुर्वेद, आर्यभट्ट यांचे संपूर्ण "भूमिती बीजगणित ज्ञान" ,  ज्ञानेश्वरांची १६ व्या वर्षी लिहीलेल्या "ज्ञानेश्वरी" तील अफाट ज्ञान कोणत्याही "टाँनिक"शिवाय मिळवले होते . 

 स्वतःला प्रश्न विचारा....
आणि शिवाय तेव्हा कुठलेही हानिकारक केमिकल मारलेले अन्नही नसायचे, गाईचे दूध पण शुद्ध... (जर्सी नाही)

आपण हजारो वर्षांपासूनचं "सायन्स" मध्ये ऍडव्हान्स होतो. 
आपल्याला या सर्वांची गरज नाही...

आपल्या संस्कृतीवर विश्वास ठेवा.

व्याख्याते / लेखक

श्री. प्रमोद विश्वनाथ ढेरे फार्मासिस्ट व नॅचरोपॅथिस्ट
संपर्क -
९२७१६६९६६९



◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆



◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆