yuva MAharashtra बेपत्ता : कामावर जातो म्हणून सांगून गेलेला २७ वर्षीय तरुण बेपत्ता.... इस्लामपूर पोलीस ठाण्यात बेपत्ता तरुणांच्या वडिलांनी दिली वर्दी...

बेपत्ता : कामावर जातो म्हणून सांगून गेलेला २७ वर्षीय तरुण बेपत्ता.... इस्लामपूर पोलीस ठाण्यात बेपत्ता तरुणांच्या वडिलांनी दिली वर्दी...



कामावर जातो म्हणून सांगून गेलेला २७ वर्षीय तरुण बेपत्ता....

इस्लामपूर पोलीस ठाण्यात बेपत्ता तरुणांच्या वडिलांनी दिली वर्दी...
-------------------------------------------------------------------
 सामान्य जनतेचा बुलंद आवाज.....!
संपादक - भाऊसाहेब रुपटक्के

---------------------------------------------------------------------


सांगली : ता.वाळवा दि. 11/01/2022

शिरटे तालुका वाळवा येथील 22 वर्षीय तरुण 9 जानेवारी 2022 रोजी रोजच्याप्रमाणे कामावर जातो म्हणून घरात सांगून गेला होता. तो अद्याप पर्यंत घरीच परतलेला नाही. याबाबत तरुणाच्या वडिलांनी इस्लामपूर पोलीस ठाण्यात वर्दी दिली आहे.

इस्लामपूर पोलीस ठाणे कडून मिळालेल्या माहितीनुसार सुयोग शंकर सुर्यगंध वय २७ वर्षे, हा एच.डी.एफ.सी. चॅक इस्लामपूर या बँकेतर्फे टी.व्ही. एस. शोरुममध्ये लोन डिपार्टमेंटला नोकरीस आहे. सुयोग हा दररोज सकाळी १०.०० वा. घरातून कामावर इस्लामपूर येथे जातो व सांयकाळी ७.३० वा. परत घरी येत असतो. दिनांक ९.१.२०२२ रोजी सकाळी १०.०० वा. सुयोग हा नेहमीप्रमाणे इस्लामपूर येथे नोकरीस गेला. सांयकाळी १०.३० वा. मुलगा सुयोग हा घरी परत आला नाही म्हणून त्याच्या वडिलांनी सुयोग याच्या मोबाईलवरती फोन केला असता तो बंद लागला नंतर
त्यांनी टी.व्ही. एस. शोरुमचे मॅनेजर धनंजय थोरात यांना फोन करून विचारले असता सुयोग हा सकाळी १०.०० ते १२.३० या कालावधी पर्यंत येथे काम करत होता नंतर तो कोठे गेला हे आम्हांस माहीत नाही असे सांगितले. सुयोग रात्री उशिरापर्यंत घरी न आल्यामुळे त्याचा भाऊ  सुमित, चुलत भाऊ रवीराज यांनी  सुयोगचा इस्लामपूर येथे एस.टी. स्टॅन्ड, आजुबाजुचे परीसरात तसेच पै पाहुणे नातेवाईक यांचेकडे शोध घेतला परंतु तो अदयाप पर्यंत मिळून आला नाही. म्हणून  सुयोग शंकर सुर्यगंध वय २७ वर्षे, हा दिनांक ९.१.२०२२ रोजी सकाळी १२.३० वा चे सुमारास इस्लामपूर येथील टि.व्ही. एस. शोरुम मधुन कोणास काही एक न सांगता निघुन गेला आहे. तरी त्याचा शोध व्हावा म्हणून सुयोगचे वडिल शंकर भिमराव सुर्यगंध वय ५१ वर्ष धंदा नोकरी  रा. शिरटे ता. वाळवा जिल्हा सांगली यांनी इस्लामपूर पोलीस ठाण्यात दि.१०/१/२०२२ रोजी वर्दी दिली आहे.पुढील तपास इस्लामपूर पोलीस करीत आहेत.


बेपत्ता झालेल्या तरुणांचे वर्णन-
नांव - सुयोग शंकर सुर्यगंध वय २७ वर्षे, उंची ५ फुट ५ इंच बांधा मध्यम, नाक लांब, रंगाने गोरा, केस काळे, अंगात निळ्या रंगाचा शर्ट, राखाडी रंगाची पॅन्ट, काळे रंगाची सॅक, युनीकॉर्न गाडी नंबर डी.जे. ५३९५, सुयोग नांवाचे एम.एच.१० टॅटू उजवे हाताचे मनगटावर, विवो कंपनीचा मोबाईल  सिम कार्ड नंबर ९५४५१७०१४१, ८३२९३३१९३३, मराठी, हिंदी, इंग्रजी  भाषा
बोलतो.

■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■



■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■