धक्कादायक -- ३४ वर्षीय तरुणांने गळफास घेऊन केली आत्महत्या...
------------------------------------------------------------------
भिलवडी | दि. 8 जानेवारी 2022
अंकलखोप-विठ्ठलनगर तालुका पलुस येथील एका 34 वर्षीय
तरुणांने राहत्या घरी पत्र्याच्या छताच्या लोखंडी एँगलला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
भिलवडी पोलीस ठाणे यांच्या कडून मिळालेल्या माहितीनुसार अंकलखोप-विठ्ठलनगर तालुका पलूस येथील संतोष दगडु भगरे या 34 वर्षीय
तरुणांने दि.6/1/2022 रोजी सायंकाळी 5:00 वा.पूर्वी त्याच्या राहत्या घरी दारुच्या नशेत नैराश्याच्या भरात पत्र्याच्या छताच्या लोखंडी एँगलला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. श्री. मोहन सोपान निकम वय 50 धंदा नोकरी रा अंकलखोप विठ्ठलनगर ता. पलुस सध्या रा सावंतपुर (पलुस) ता. पलुस यांनी भिलवडी पोलीस ठाण्यात सदर घटनेची वर्दी दिलेने मयत रजिस्टरी दाखल करुन भिलवडी पोलीस ठाण्याचे सपोफौ श्री. वंजारी व पोकाँ श्री.माने यांनी तात्काळ घटनास्थळच्या ठिकाणी भेट देऊन प्राथमिक तपास केला आहे.
सदर घटनेची दाखल पोहेकॉ श्री. इनामदार यांनी करून घेतली असून साय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडग यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास भिलवडी पोलीस करीत आहेत.
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■