शिवरायांचे विचार आचरणात आणण्यासाठी पुढाकार घ्या....शरद जाधव
सार्वजनिक वाचनालयात शिवजयंती साजरी
====================================================================
भिलवडी | दि.२०/०२/२०२२
घराघरात शिवजयंती साजरी होत आहे त्याचबरोबर घराघरात शिवचरित्र असणे काळाची गरज आहे,शिवरायांचा इतिहास अभ्यासून त्यांचे विचार आचरणात आणण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा.
इतिहास डोक्यावर घेवून नाचण्यापेक्षा तो डोक्यात ठेवून भविष्याचा वेध घेतल्यास आदर्श समाज निर्मिती होईल असे प्रतिपादन शिवव्याख्याते शरद जाधव यांनी व्यक्त केले.
सार्वजनिक वाचनालय भिलवडी ता.पलुस येथे शिवजयंती निमित "शिवबा समजून घेताना.." या विषयावर व्याख्यान प्रसंगी ते बोलत होते.शिवव्याख्याते शरद जाधव यांच्या हस्ते शिवप्रतीमेचे पूजन करण्यात आले.त्यांच्या संग्रहात असलेल्या शिव चरित्रावर आधारित पुस्तकांचे प्रदर्शन भरविण्यात आले.
यावेळी शरद जाधव यांनी
शिवचरित्रातील विविध घटना चालू स्थितीमध्ये कशा पद्धतीने उपयोगी पडू
शकतात अशा अनुषंगाने मार्गदर्शन केले.रमेश चोपडे यांनी स्वतः रचलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील पोवाडा सादर केला.अमेय नलवडे या विद्यार्थ्याने आपले मनोगत व्यक्त केले.
सार्वजनिक वाचनालय भिलवडी चे कार्यवाह सुभाष कवडे सरांनी संयोजन केले.यावेळी वाचनालयाचे संचालक जी.जी.पाटील,जयंत केळकर,आबासाहेब आंबी,सतीश तोडकर,संदिप नाझरे,ग्रंथपाल
वामन काटीकर आदींसह वाचक सभासद उपस्थित होते.
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■