सानेगुरुजी संस्कार केंद्राच्या काव्य लेखन स्पर्धेत हरिपूर हायस्कूलची अमृता कुंभार प्रथम..
-- जिल्ह्यातून ४५ विद्यार्थी सहभागी
---------------------------------------------------------------------
--------------------------------------------–-----------------------
--------------------------------------------–-----------------------
भिलवडी | दि.१८/०२/२०२२
पूज्य सानेगुरुजी संस्कार केंद्राच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त घेण्यात आलेल्या राष्ट्रभक्तीपर काव्य लेखन स्पर्धेत श्रीमती कोंडाबाई साळुंखे हायस्कूल हरीपूर या शाळेची विध्यार्थी कु.अमृता निलाप्पा कुंभार इयत्ता ९वी हिचा प्रथम क्रमाक आला आहे सानेगुरुजी संस्कार केंद्राचे केंद्रप्रमुख व स्पर्धेचे संयोजक सुभाष कवडे यांनी हि माहिती दिली.स्पर्धेचा सविस्तर निकाल श्री.कवडे यांनी पुढीलप्रमाणे जाहीर केला
प्रथम क्रमांक –अमृता निलाप्पा कुंभार (कोंडाबाई साळुंखे हायस्कूल हरिपूर)
द्वितीय क्रमांक –आरती बाळकृष्ण कदम (श्री.महालक्ष्मी हायस्कूल देशिंग हरोली)
तृतीय क्रमांक –हर्षदा मोहन चौगुले (क्रांतिवीर दत्ताजीराव पाटील विद्यालय सोनी)
चतुर्थ क्रमांक –ऋतुजा दुर्योदन जावीर (विठलापूर हायस्कूल विठलापूर)
पाचवा क्रमांक –सुर्ष्टी सुदर्शन पाटील (जयभारत विद्यालय वसगडे)
कु.प्रितल सावळवाडे(भिलवडी),अथर्व घोरपडे(देशिंग),आरती वावरे(भिलवडी) या विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ पारितोषिके दिली जाणार आहेत
या स्पर्धेत जिल्ह्यातून ४५ विद्यार्थी सहभागी झाले होते स्पर्धेचे परीक्षण बालसाहित्यिक श्री.ह.रा.जोशी (औदुंबर)व मराठी अध्यापक संघाचे कार्याध्यक्ष बजरंग संकपाळ(कर्नाळ) यांनी केले वरील यशस्वी स्पर्धकांना संस्कार केंदाच्या विश्वस्त श्री.सुनिता चितळे (वाहिनी) यांचे वतीने पुस्तके व प्रमाणपत्रे दिली जाणार आहे स्पर्धेचा बक्षीस वितरण समारभ २७ फेब्रुवारी २०२२ रोजी मराठी राजभाषा गौरव दिनी सांगली येथे मथूबाई गरवारे कन्या महाविद्यालयात संपन्न होणार असून यावेळी विद्यार्थ्यांचे कवी संमेलन हि होणार असल्याची माहिती श्री.सुभाष कवडे यांनी दिली.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆