वसगडे येथे महावितरणच्या कार्यालया मध्ये घुसून आंदोलन व वीज बिलांची होळी....
-------------------------------------------------------------------
-------------------------------------------------------------------
वसगडे | दि.०३/०२/२०२२
वसगडे तालुका पलुस येथे आज दि. ३ फेब्रुवारी २०२२ रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने महावितरणच्या कार्यालया मध्ये घुसून आंदोलन व वीज बिलांची होळी करण्यात आली.
महावितरणने कोणतीही पूर्वसूचना न देता शेतकऱ्यांचे शेतीपंपाचे विद्युत कनेक्शन कट केले. जवळपास सहा महिने झाले नदीवरील शेती पंपाच्या विद्युत मोटारी बंद असून त्यांना महावितरणने प्रत्यक्षात जागेवर जाऊन मीटरचे रीडिंग न घेता अवास्तव वीज बिले एचपी प्रमाणे शेतकऱ्यांच्या माथी मारले आहे व शेतकऱ्यांचे विद्युत कनेक्शन तोडत आहे. ते तोडलेले कनेक्शन तात्काळ जोडा व कनेक्शनची तोडणी तात्काळ थांबवा ही प्रमुख मागणी घेऊन आंदोलन करण्यात आले.
यावेळी संदीप राजोबा म्हणाले जी लाईट वापरलीच नाही त्याचं लाईट बिल आम्ही भरणार नाही चुकीची लाईट बिल तुम्ही दिलेले आहेत ती दुरुस्त करण्याची जबाबदारी महावितरणची आहे सलग दोन वर्षे आलेल्या महापुरामुळे वसगडे विभागातील वसगडे ब्रह्मनाळ खटाव सुखवाडी या गावांना ऊस व सोयाबीनची पिके हाती लागलेली नाहीत तसेच सध्या अजून शेतामध्ये उभा ऊस आहे अजून तो त्याची तोडणी व्हायची आहे तसेच सांगली जिल्ह्यातील कोणत्याही साखर कारखान्यांनी एक रकमी एफ आर पी दिली नाही साखर कारखान्यांनी गाळप झालेल्या उसाला एकूण एफ आर पी च्या जवळपास साठ टक्के रक्कम शेतकऱ्यांना दिले आहे. त्यामुळे शेतकऱ्याने काढलेले पिक कर्ज सुद्धा भागलेले नाही तसेच ऊस गेल्यानंतर शेतकरी सोयाबीन पिक करत आहे शेतकऱ्याने महाबीज कडून जवळपास 120 ते दीडशे रुपये प्रति किलो पर्यंतचे महागडे बियाणे आणून शेतकरी सोयाबीन करत आहे कारण पावसाळा मध्ये संपूर्ण शेती पाण्या मध्ये असल्यामुळे त्याला सोयाबीन बुडून जाते व त्याचा लाभ होत नाही त्यामुळे शेतकऱ्याचा उन्हाळी सोयाबीन करण्याकडे कल वाढलेला आहे तसेच बाजारपेठेमध्ये सोयाबीनला सध्या चांगला भाव आहे जर का आता त्याला पाणी नाही दिले तर शेतकरी पुन्हा एकदा उध्वस्त होणार आहे त्यामुळे तात्काळ लाईट जोडा अशी मागणी शाखा अभियंता माळी यांना निवेदनाद्वारे केली.
काही काळ वातावरण तणावाचे निर्माण झाले होते स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला होता महावितरणच्या वरिष्ठांशी चर्चा झाल्यानंतर जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत विद्युत कनेक्शन तोडणार नाही व तोडलेले कनेक्शन जोडतो असे आश्वासन तासगाव उपअभियंता दोन अधिकारी होनमाने सो यांच्या वतीने शाखा अभियंता माळी यांनी दिले त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले जर याच्यामध्ये महावितरणने काही गद्दारी केली रस्त्यावर उतरून स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल व होणाऱ्या परिणामांची सर्वस्वी जबाबदारी ही महावितरणची राहील असा इशारा देण्यात आला यावेळी प्रमुख उपस्थिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष धन्यकुमार पाटील , अशोक पाटील , शरद पाटील , अजमुद्दिन इनामदार , अजित सावकर , विजय पाटील , संजय पाटील , जंबू चव्हाण , कलगोंडा पाटील , सहदेव कारंडे , संतोष राजोबा , भरत गडकरी , सतीश राजोबा सह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆