नॅशनल अँटी क्राईम & ह्यूमन राईट कोन्सिल ऑफ इंडिया, महाराष्ट्र संचालक बॉडीची बैठक
मिरज येथील शासकीय विश्रामधाम येथे संपन्न...
सांगली , कोल्हापूर , सोलापूर , नाशिक जिल्ह्यातील नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा निवड पत्र व ओळखपत्र देऊन सन्मान...
------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------
मिरज | ता. 23 / 02 / 2022
मिरज येथील शासकीय विश्रामधाम मध्ये नॅशनल अँटी क्राईम & ह्यूमन राईट कोन्सिल ऑफ इंडिया चे राष्टीय अध्यक्ष मा. दिवास लामा यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र संचालक बॉडीची बैठक नुकतीच पार पडली.
या बैठकीत नाशिक , कोल्हापूर , सांगली , सोलापूर या जिह्यातुन नॅशनल अँटी क्राईम & ह्यूमन राईट कोन्सिल ऑफ इंडिया मध्ये नवनिर्वाचित पदाधिकारी यांच्या निवडी करण्यात आल्या.
महाराष्ट्र अध्यक्ष मा. कृपादन सिंहमारे व महाराष्ट्र जनरल सेक्रेटरी मा अस्लम कोथळी मा. उप अध्यक्ष समाधान लोंढे यांच्या हस्ते निवड पत्र व ओळख पत्र देण्यात आले.
यावेळी श्रीमती वंदना विकास शाहाणे मेटरन मिरज शासकीय विद्यालय व रूग्णालय व पा. पिंटू भोरे यांना वैद्यकीय सेवा रत्नाने संन्मानित करण्यात आले तर बि.एस. एन. एल सांगली चे श्री. अमोल गायकवाड (पॉवर वेटलिफ्टिंग नॅशनल गोल्ड मिडेलिस्ट) व साई अकॅडमी सांगली चा ग्लोल्ड मिडलिस्ट स्केटींग पटू जियानअल्ली तांबोळी वय वर्ष 9 या सर्वांना महाराष्ट्र राज्यचे अध्यक्ष मा कृपादान सिंहमारे यांचा हस्ते स्मानपत्र व मानचिन्ह देऊन सन्मानित करणेत आले.
या बैठकीसाठी उपस्थित असणारे प्रमुख पाहुणे मा. डॉ. मूनकीर मुजावर ,मा. फारुख सगतरास. यांनी वैद्यकीय बाबी , रुग्ण सेवा व समाजसेवा या विषयावर नवनिवाचीत पद्धअधिकारी यांना मार्गदर्शन केले.
दुजाभाव व जातपात न करता गोरगरीब जनतेची सेवा करणे , त्यांना न्याय व हक्क मिळवून देणे याविषयी व अन्याय अत्याचार मानवी हनन कशा पददतीने रोखता येईल व बेरोजगारांना रोजगाराची संधी कशी उपलब्धता करता येईल या विषयी महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष मा. कृपादन सिंहमारे यांनी मार्गदर्शन केले.
महाराष्ट्र जनरल सेक्रेटरी यांनी सामाजिक काम करताना लोभ व मी पणा न बाळगता कायद्याचा चाकोरीतून कशा पददतीने काम कऱयायचे व ,रुग्णसेवा व शैक्षणिक मुद्यांच्या विषयावर कायदेशीर माहिती दिली.
समाजसेवा , मानवी हनन , बेरोजगारी व शैक्षणिक अडचणी यावर प्रत्येक जिल्ह्यातुन वैचारिक सामाजिक कार्यकर्ते जमवून एक टीम करून जोरदार कामाला सुरुवात करणेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष मा. समाधान लोंढे यांनी आवाहन केले.
मा. राजेंद्र लोंढे यांनी ही संघटना याविषयी प्रबोधन केले.
नवनिर्विचीत पदाधिकारी - नाशिक जिल्ह्याचे अध्यक्ष श्री. नवनाथ आहिरे ,नाशिक जिल्ह्या उपाध्यक्ष श्री. संजय जाधव , नाशिक जिल्ह्या जनरल सेक्रेटरी सय्यद आयाजअल्ली, अशरफअल्ली नाशिक जिल्हा जनसंपर्क अधिकारी अण्णासाहेब सोमासे ,कार्यकारी अध्यक्ष मा. श्री सम्राट ताक , सोलापुर जिल्हा अध्यक्ष मा. श्री. विक्की चांदणे , जनरल सेक्रेटरी श्री. किरण पारवे , सांगली जिल्हा अध्यक्ष मा. श्री. सचिन गनगटे
उपअध्यक्ष संजय सुतार ,कॉर्डिनेटर श्री. निलेश साळूंखे , कॉर्डिनेटर, श्री निखिल साळूंखे जनरल सेक्रेटरी,कार्यकारी अध्यक्ष श्री संजय कोलप ,कोल्हापूर जिल्हा महिला विभाग अध्यक्ष सौ. प्रणिता माळी यांची यावेळी निवड करण्यात आली व त्यांना निवड पत्र व ओळखपत्र देऊन समान त्यांचा सत्कार करणेत आला व पुढील वाटचाली साठी शुभेच्छा महाराष्ट्र राज्याच्या पदाधिकाऱ्यां कडून देण्यात आल्या. या कार्याच्या द्वारे नॅशनल अँटी क्राईम अँड ह्यूमन राइट्स कन्सिल ऑफ इंडिया या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे संघटन करण्यात आले. या कार्यक्रमाची सांगता मा. दिलीप डांगे यांनी सर्वांचे आभार मानून केले.