yuva MAharashtra उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना अपंग जनता दलाच्या वतीने अपंगांच्या विविध मागणीचे दिले निवेदन...

उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना अपंग जनता दलाच्या वतीने अपंगांच्या विविध मागणीचे दिले निवेदन...





उपमुख्य कार्यकारी अधिकारी  यांना अपंग जनता दलाच्या वतीने अपंगांच्या विविध मागणीचे दिले निवेदन... 

--------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------

अमरावती | दि.१७/०२/२०२२

( प्रतिनिधी - हंसराज उके अमरावती )

  अपंग जनता दल सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य जिल्हा अमरावती यांच्या वतीने अपंगांच्या विविध योजना व सवलतीच्या शासन निर्णयाची सक्तीने अंमलबजावणी तात्काळ करण्यात यावी व जिल्हातील अपंग बांधव हा कोणत्याही योजने पासून व सवलती पासून वंचित राहू नये यासाठी अपंग जनता दल सामाजिक संघटना जिल्हा अमरावती यांच्या वतीने जिल्हाध्यक्ष मयूर मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी  यांच्या दालनात दिनांक 16/02/2022 रोजी लेखी निवेदनाद्वारे ठिय्या आंदोलनचा इशारा दिला होता.  जिल्हा परिषद प्रशासनाने सदर निवेदनाची तात्काळ दाखल घेत अपंग जनता दल सामाजिक संघटनेचे पदाधिकारी यांच्या सोबत  बैठक घेऊन चर्चा केली परंतु  आंदोलन होणारच या भूमिकेत पदाधिकारी होते. अखेर अपंग नेते शेख अनिस (पत्रकार) व समाज कल्याण अधिकारी राजेंद्र जाधव यानी मध्यस्थी केली.  प्रशासनाकडून संबधित वरिष्ठ अधिकारी यांना लेखी पत्र देण्यात आले असून  अपंग जनता दल सामाजिक संघटनेच्या पदाधिकारी यांनी आंदोलन तात्पुरते स्थागित करून फक्त निवेदन देणार असा निर्णय घेतला.


अपंगांच्या विविध मागण्याचे निवेदन उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम टेकाडे यांना देऊन त्यांच्या सोबत अपंग जनता दल सामाजिक संघटनेच्या पदाधिकारी यांनी चर्चा केली या चर्चेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम टेकाडे यांनी लवकरच  वरिष्ठ अधिकारी यांच्या सोबत बैठक लावणार असल्याचे आश्वासन दिले. 


यावेळी मयूर मेश्राम जिल्हा अध्यक्ष, सुधाकर काळे, राजिक शाह, राहुल वानखडे, अन्वर शाह, रुस्तम शेख, जाहिर खाना, कांचन कुकडे, अजय वाहूरवाग, इलाहीस शेख, मुतलीख चाऊस, गणेश वानखडे, राजिक शेख, अर्चना मुडले, गोपाल वनवे, प्रभाकर राऊत, व अनेक कार्यकर्ते उपस्तित होते.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆



◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆