yuva MAharashtra क्रांतिवीर कॅप्टन रामभाऊ लाड म्हणजे प्रतिसरकारचे चालते बोलते विद्यापीठ... माजी मंत्री आण्णासाहेब डांगे...

क्रांतिवीर कॅप्टन रामभाऊ लाड म्हणजे प्रतिसरकारचे चालते बोलते विद्यापीठ... माजी मंत्री आण्णासाहेब डांगे...




क्रांतिवीर कॅप्टन रामभाऊ लाड म्हणजे प्रतिसरकारचे चालते बोलते विद्यापीठ...

माजी मंत्री आण्णासाहेब डांगे...

======================================


======================================

कुंडल | ता. ०१ / ०३ / २०२२

माजी ग्रामविकास मंत्री 
आण्णासाहेब डांगे यांनी सुमारे तासभर आज क्रांतिवीर कॅप्टन रामभाऊ लाड यांच्या निवासस्थानी क्रांतिवीर कॅप्टन भाऊंच्या गत आयुष्यातील आठवणींना उजाळा दिला..

क्रांतिसिंह नाना पाटील..
जी.डी बापू लाड ,नागनाथ आण्णा नायकवडी ,क्रांतिवीर कॅप्टन रामभाऊ लाड प्रतिसरकारचा इतिहास व जुना मंतरलेला काळ आण्णासाहेब डांगे यांनी डोळ्यासमोर उभा केला..





क्रांतिवीर कॅप्टन रामभाऊ लाड हे माझे कायमच आदर्श होते..
मी कुंडल येथे अनेक वेळा क्रांतीवीर कॅप्टन भाऊंना भेटून, त्यांच्यासोबत मनसोक्त चर्चा करुन त्यांचा आशीर्वाद घेऊन जात होतो..

कुंडल येथील क्रांतिसिंह नाना पाटील स्मारक, व स्मृती स्तंभ ही दोन्ही स्मारके स्थापन करताना क्रांतिवीर कॅप्टन भाऊंची तळमळ मी अत्यंत जवळून पाहिली आहे..

कॅप्टन भाऊंनी सातारा प्रतिसरकार मधील अनेक रोमहर्षक चित्तथरारक प्रसंग स्वतः अनुभवले आहेत, प्रतिसरकारच्या तुफान सेनेचे प्रमुख रणझुंजार कॅप्टन पद क्रांतिवीर भाऊंच्या कडे होते..




हे थरारक प्रसंग कॅप्टन भाऊंनी अनेक मुलाखती, व क्रांतिकारी साहित्यामधून मांडत प्रभावी पुस्तकांची निर्मिती केली आहे.

क्रांतिवीर कॅप्टन भाऊंची ऐतिहासिक पुस्तके मी स्वतः वाचली आहेत..

कुंडलच्या जगप्रसिद्ध कुस्ती मैदानाची ख्याती, शिस्त, अलोट गर्दी,आंतरराष्ट्रीय पातळीवर कीर्तिमान करणारे कॅप्टन रामभाऊ लाड म्हणजे माझ्यासह सर्व जुन्या काळातील सर्व नेत्यांचे आयडॉल आदर्श होते..

कॅप्टन भाऊंनी सांगितलेला प्रतिसरकारचा इतिहास मंत्रमुग्ध होऊन एकावा अशा तळमळीने भाऊ तुफान सेनेची कार्यपद्धती अभ्यासू व प्रभावी शैलीत मांडत होते.


हाच गौरवशाली वारसा इतिहास नव्या पिढीला स्वातंत्र्याचा धगधगता इतिहास समजला पाहिजे अशी भावना अण्णासाहेब डांगे यांनी व्यक्त केली.



कॅप्टन रामभाऊ लाड म्हणजे "भली मोठी माणूस"
कॅप्टन भाऊंच्या निष्ठेला व मनाच्या मोठेपणाला तोड नाही..

मागील दोन महिने प्रकृती स्वास्थ्य मुळे हॉस्पिटलमध्ये होतो.. माझी त्रीव्र इच्छा असून देखील..
मी कॅप्टन भाऊंच्या दुःखद प्रसंगी येऊ शकलो नव्हतो..
परंतू माझ्या कुटुंबातील सदस्यांना मी सर्व विधींना आवर्जून पाठवले होते. 
माझे वय ८८ आहे..
तरीही माझे मन राहवत नव्हते.
आज कुंडल येथे कॅप्टन भाऊंच्या कुटुंबियांना तुम्हाला भेटायला आलो आहे असे भावनीक उद्गार माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी काढले..



◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆



◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆