जीवनात खेळाचे स्थान महत्वपूर्ण - एम. टी.देसाई
क्षितिज गुरुकुल विद्यानिकेतन मध्ये क्रीडा महोत्सव संपन्न...
=====================================
=====================================
भिलवडी | दि. ०२ / ०३ / २०२२
सिध्दविनायक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित क्षितिज गुरुकुल विद्यानिकेतन व ज्युनिअर कॉलेज बुरूंगवाडी येथे शालेय वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न झाला.ज्येष्ठ व्हॉलीबॉल प्रशिक्षक एम. टी.देसाई यांच्या हस्ते व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुनिल(बापू) जाधव यांच्या अध्यक्षतेखाली व कार्यवाह सौ.वनिता जाधव यांच्या प्रमुख उपस्थतीमध्ये महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.
प्रारंभी मान्यवर पाहुण्यांचे हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून क्रीडा ज्योत प्रज्वलित करण्यात आली.
यावेळी बोलताना एम. टी.देसाई म्हणाले की,विद्यार्थी दशेतच ध्येय निश्चित करून वाटचाल केल्यास भविष्यात यश प्राप्त करणे सोपे जाईल.जीवनात खेळाचे स्थान महत्वपूर्ण असून प्रत्येकाने एखाद्या तरी खेळात परिपूर्ण बनावे.अभ्यासाबरोबरच खेळाच्या माध्यमातून विविध संधी उपलब्ध असून त्याचा लाभ घेण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील रहावे.
कोरोना कालावधीत मुले खेळ विसरली होती.शाळेने क्रीडा महोत्सवाचे आयोजन करून विद्यार्थ्यांसाठी संधी उपलब्ध करून दिली आहे.अभ्यासाबरोबर खेळाशी मैत्री केल्यास विद्यार्थ्यां च्या व्यक्तिमत्वा विकास निश्चित होईल असे प्रतिपादन सुनिल (बापू) जाधव यांनी केले.
यावेळी प्राचार्य सौ.स्वाती पाटील,मुख्याध्यापिका सौ.दीपाली जाधव यांच्यासह सर्व शिक्षक स्टाफ उपस्थित होता.
क्रीडा शिक्षक नागेश धनवडे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले.अमोल सपकाळ यांनी विद्यार्थ्यांना क्रीडा प्रतिज्ञा दिली.अर्चना शिंदे यांनी सूत्रसंचालन केले तर प्रकाश जाधव यांनी आभार मानले.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆