रणसंग्राम चे ॲड दीपक लाड व सहकारी आणि होम मिनिस्टर फेम नितीन गवळी यांचे पुणे बेंगलोर द्रुतगती मार्गावर माणुसकीचे दर्शन...
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
पलुस | दि. २८ / ०३ / २०२२
रविवारी सायंकाळी ५ वाजता पुणे बेंगलोर महामार्गावर बांबवडे ता पलुस येथील तरुणाचा गंभीर अपघात झाला. जखमी तरुणास तात्काळ पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले..
रणसंग्राम सोशल फाउंडेशनचे ॲड. दिपक लाड, होम मिनिस्टर फेम नितिन भाऊजी गवळी, प्रा श्रीदास होनमाने, ॲड क्रांती पाटील, अविनाश मोहिते, जुगाड जिप्सी चे दत्ता लोहार, हनीफ शेख हे गिरिप्रेमी ग्रुप महाराष्ट्र राज्य नियोजित ट्रेकसाठी किल्ले मल्हारगड ता पुरंदर येथे आज सकाळी गेले होते तेथून किल्ले मल्हारगड ट्रेक संपवून पाठीमागे येत असताना पुणे मुंबई द्रुतगती हायवे वरती शिरवळ येथे रस्त्यालगत त्यांना गर्दी दिसताक्षणी कुंडल चे सर्वजण त्या ठिकाणी थांबले, तिथे भारती विद्यापीठ कात्रज येथील लिपिक अमर टोमके यांचा (शिरवळ एमआयडीसी नजीक) मोटरसायकल MH10DF6689 चा अपघात झाला होता, सदर अपघातील गाडी MH10 असल्या कारणाने सखोल चौकशी केली असता ती सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील बांबवडे गावातील अमर टोमके या तरुणाची गाडी असल्याचे समजले, अपघातानंतर त्याला शिरवळ येथील जोगळेकर हॉस्पिटल येथे प्रथम उपचारासाठी हलवण्यात आले असल्याचे समजताच आपल्याच भागातील तरुण जखमी झाल्याचे प्रसंगावधान जाणून रणसंग्राम च्या सर्व कार्यकर्त्यांनी शिरवळ येथील जोगळेकर हॉस्पिटलमध्ये धाव घेतली, पण तिथून त्यांना खंडाळा येथील हॉस्पिटल येथे हालवल्याचे सांगितले..
तात्काळ खंडाळा येथील हॉस्पिटल मानसी येथे सर्वांनी धाव घेतली, सदर तरुणास उपचारास दाखल करून प्राथमिक उपचार होत असताना ॲड दीपक लाड आणि सहकारी आणि नितीन गवळी यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून अमर ठुमके यांच्या कुटुंबाशी संपर्क करण्यात यश आले..
हॉस्पिटल चे डॉक्टर धमाळ यांना त्वरित उपचार करण्यास सांगितले असता अत्यंत जलद गतीने मानसी हॉस्पिटल चे डॉ ढमाळ यांनी तातडीने उपचार करून सहकार्य केले.
उपचारानंतर अपघातामधील जखमीजी परिस्थिती सध्या चिंताजनक नाही, असे डॉ ढमाळ यांनी सांगितले.
जखमींच्या कुटुंबाचे , व मित्र परिवाराचे संपर्कात समन्वय साधून धीर देण्याची जबाबदारी ॲड दिपक लाड, नितीन गवळी
यांनी पार पाडली.
यावेळी कुंडलच्या डॉ गौरी मोकाशी या हॉस्पिटलमध्ये सेवा देत होत्या, डॉ मोकाशी व सहकारी स्टाफ यांनी अत्यंत चांगले सतर्कता दाखवत उचित उपचार केला, दरम्यान अमर ठुमके यांचे मित्र आणि भारती हॉस्पिटल चे स्टाफ निलेश देसाई, सूर्यकांत जगताप, आसिफ शेख, राहुल सावंत, शिवाजी कोटकर, यांना बोलावून घेतले, अमर टोमके यांना त्यांचे मित्र हे पुढे भारती हॉस्पिटल पुणे येथे जखमीस घेउन गेले.. असता दोन तासानंतर कुंडल चे
रणसंग्राम सोशल फाऊंडेशन चे सदस्य कुंडलकडे रवाना झाले.
सदर अपघाताचे प्रथम दर्शी मसुचिवाडी चे किरण कदम, तुषार वाघ, अभिषेक वाघ यांनी
अपघात स्थळी मोठी मदत केली.
रणसंग्राम च्या सर्व कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे एका जखमीस योग्य वेळी उपचार मिळाल्याने परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे.
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●