yuva MAharashtra भिलवडी येथील सार्वजनिक वाचनालयाच्या वाचन कट्ट्यावर वााचन प्रेमींनी कुसुमाग्रजांच्या कवितांचा केेला जागर ..

भिलवडी येथील सार्वजनिक वाचनालयाच्या वाचन कट्ट्यावर वााचन प्रेमींनी कुसुमाग्रजांच्या कवितांचा केेला जागर ..





भिलवडी  येथील सार्वजनिक वाचनालयाच्या वाचन कट्ट्यावर वााचन  प्रेमींनी  कुसुमाग्रजांच्या कवितांचा केेला जागर ..

=====================================


=====================================

भिलवडी | ता. ०३ / ०३ / २०२२

भिलवडी ता.पलूस येथील वाचन कट्ट्यावर वाचन प्रेमींनी कुसुमाग्रजांच्या कवितांचा जागर केला.भिलवडी सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष उद्योजक गिरीश चितळे यांच्या अध्यक्षतेखाली २७ वा.वाचन कट्टा संपन्न झाला.मी वाचलेली कुसुमाग्रजांची कविता या विषय वाचकांना देण्यात आला होता.
चितळे उद्योग समूहाचे संचालक मकरंद चितळे यांनी वाचनालयास 
 दहा हजार रुपयांची देणगी दिली.वाचनालयाच्या वतीने ग्रंथ भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.


ह. रा.जोशी (प्रिय हा भारत देश आमुचा),डी.आर.कदम (मैत्रीण),संजय कदम (माझ्या मराठी मातीचा),संजय पाटील (भक्तीभाव),जगन्नाथ माळी (नाते),तुकाराम पाटील ( ज्ञानेश्वर),हकीम तांबोळी (टपाल),सौ.उर्मिला डिसले (कणा), 
शरद जाधव (प्रेम),रमेश चोपडे ( माझा हिंदुस्तान),सुभाष कवडे (चांदोबा),जी.जी.पाटील (क्रांतीचा जयजयकार) आदी वाचक सभासदांनी 
सादर केलेल्या कवितांना उपस्थितांनी दाद दिली.


हणमंत डिसले व ह. रा.जोशी यांनी कुसुमाग्रजांच्या ग्रंथ संपदेविषयी  माहिती सांगितली.यावेळी बोलताना गिरीश चितळे म्हणाले की,मराठी भाषा समृद्ध करण्यात कुसुमाग्रजांचे योगदान मोठे आहे.वाचन कट्टा या उपक्रमामुळे वाचन चळवळ योग्य पद्धतीने रुजत आहे.वाचनालयाचे कार्यवाह सुभाष कवडे यांनी वाचन कट्ट्यावरील कविसंमेलनाचे बहारदार सूत्रसंचालन केले.यावेळी ए.के.चौगुले,आबासाहेब आंबी,ग्रंथपाल वामन काटीकर आदीसह वाचक सभासद उपस्थित होते.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆



◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆