yuva MAharashtra मी भिलवडीचा घाट बोलतोय..

मी भिलवडीचा घाट बोलतोय..






मी भिलवडीचा घाट बोलतोय........  

======================================


======================================

भिलवडी | ता. ३० मार्च २०२२


 भिलवडीचा घाट म्हणजे आपलं भूषण आहे.मान-सन्मान-अभिमान-स्वाभिमान आहे.भिलवडीकरांची अस्मिता म्हणजे आपला कृष्णाघाट आहे.  
आज वेगवेगळ्या माध्यमातून भिलवडीची ओळख होत असली तरी भिलवडीची खरी ओळख म्हणजे आपला *ऐतिहासिक कृष्णाघाट* आहे.  




अनेक अर्थानी कृष्णाघाट गेली 243 वर्षे आपली सेवा करीत आहेच..पण महापूर काळामध्ये घाटाचं महत्त्व खऱ्या अर्थानं अधोरेखित होतं.  

घाट आहे म्हणून भिलवडीचा थाट आहे हेच खरं... 
 
1779 साली बांधलेल्या या घाटाचा रुबाब महापुरामुळे असेल किंवा अन्य कारणांमुळे असेल थोडा कमी व्हायला लागलाय.
   ओवरीवर झाडं उगवत आहेत..  पायऱ्यांची..बुरुजांची दगडे निसटली आहेत..निसटायला लागली आहेत.दगडांची झीज होते आहे.
  एकूणच आता घाटाचं संवर्धन करणं ही आपली जबाबदारी बनलेली आहे.
  
आणि त्याच अनुषंगाने इतिहासतज्ज्ञ श्रीमंत कोकाटे सर यांच्याशी संपर्क साधला होता.पुरातन ऐतिहासिक वास्तूंचे जतन करणारे आणि त्याच पध्दतीने फिनिशिंग करणार्या काही मंडळींशी आमचा संपर्क कोकाटे सरांनी घडवून आणला होता.  

नाशिकच्या अजिंक्यतारा कन्सल्टंटचे संचालक आणि संवर्धन सल्लागार योगेश पाटील ( B.E.सिव्हिल-M.A.इतिहास व पुरातत्त्वशास्त्र (आर्कियोलाॅजी)
पोस्ट ग्रॅज्युएट इन डिप्लोमा सायंटिफिक कन्सर्वेशन अँड हेरिटेज मॅनेजमेंट) आमच्या विनंतीला मान देऊन आज भिलवडीत आले होते.घाटावर प्रत्यक्ष येऊन त्यांनी पाहणी केली.काही नोंदी करून घेतल्या.काही महत्त्वपूर्ण सूचनाही केल्या. घाटाच्या संवर्धनाकरिता अंदाजे किती खर्च येईल या संदर्भामध्ये लवकरच ते आम्हाला सूचना करणार आहेत.


भिलवडी ग्रामपंचायत सध्या वैविध्यपूर्ण विकासकामांमध्ये सक्रिय आहे..आघाडीवर आहे.घाटाला गतवैभव मिळवून देण्याबाबत ते सकारात्मक आहेत आणि भिलवडीकर निश्चितपणे साथ देतील अशी खात्री आहे.    
   
   सध्या घाटाच्या पूर्वेला पूर संरक्षक भिंतीचे काम सुरू आहे.डॉ.पतंगराव कदम साहेबांच्या प्रयत्नांमुळे पश्चिमेला झालेल्या पूरसंरक्षक भिंतीमुळे पुराच्या पाण्याचा पाटील गल्लीला असलेला संभाव्य धोका टळलेला होता.आता ती भिंत आणखी वाढवण्याची गरज आहे.

  


भिलवडीच्या सुख दुःखामध्ये नेहमी सहभागी असणारे आणि महापुरामध्ये कसं काम करायचं असतं याचे रोल मॉडेल राज्याचे कृषी-सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम साहेब, घाटाचे जतन करण्याच्या कामामध्ये आणि पूर संरक्षक भिंतीमध्ये लक्ष घालतील अशी आशा आहे.


••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••


••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••


••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••