नोंदणीकृत मयत बांधकाम कामगारांच्या मुलांचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत मंडळाने शैक्षणिक, आर्थिक मदत करावी...
बांधकाम कामगाराला वयाची अट न ठेवता मयत बांधकाम कामगारांच्या वारसास सरसकट २ लाख रुपये आर्थिक मदत मिळावी...
संजय कांबळे...
======================================
सांगली | ता. ४ मार्च २०२२
अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघाचे सांगली जिल्हाध्यक्ष संजय कांबळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज सहाय्यक कामगार आयुक्त मा.अनिल गुरव साहेब सांगली यांची भेट घेऊन निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे, आपणास आद.ॲड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या अखिल महाराष्ट्र कामगार - कर्मचारी संघ,महाराष्ट्र राज्य,सांगली जिल्हा मार्फत अशी मागणी करण्यात येते की,महाराष्ट्र शासनाने श्रमिक, कष्टकरी, गोरगरिब कुटुंबातील बांधकाम कामगारांना सामाजिक,आर्थिक,शैक्षणिक उन्नती व्हावी तसेच त्यांना उत्तम आरोग्यदायी जिवन लाभावे या करिता महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ स्थापन केलेले आहे. त्या मंडळाच्या मार्फत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील कष्टकरी, श्रमिक कामगारांना विविध योजनेच्या द्वारे मदत करण्याचे कार्य सुरू आहे.परंतु नोंदणीकृत असणारा कामगार जोपर्यत जिवंत असतो तोपर्यत त्याच्या मुलांना शैक्षणिक मदत मंडळाच्या मार्फत दिली जाते,परंतु त्या कामगाराचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या मुलांना दिले जाणारी शैक्षणिक, आर्थिक मदत बंद होते हे त्या निराधार कुटुंबीयासाठी अन्यायकारक आहे.कारण त्या कुटुंबातील कर्ता व कमवता सदस्याचा मृत्यू झाल्यानंतर त्या गरीब कुटुंबाची परिस्थिती अत्यंत बिकट झालेली असते त्यांना जिवन जगणे असहाय्य झालेले असते.अशावेळी बऱ्याच मुलांना आपले शिक्षण अर्धवट सोडून मिळेल ती कामे करावी लागत असतात,यामुळेच एखादा हुशार विद्यार्थी परिस्थिती मुळे शिक्षणा पासून वंचित राहु शकतो कारण कमावता व्यक्ती गेल्याने संबंधित कुटूंबियांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागते आहे, अचानक घरातील व्यक्ती गेल्याने दैनंदिन गरजा भागविण्यासाठी अनेक वेळेला कर्ज काढून घर चालवावे लागते अश्यावेळी खरी मदतीची गरज त्या संबंधित कुटूंबाला कामगाराचा मृत्यू झाल्यानंतर अत्यंत आवश्यक असते. तसेच मंडळाने आखून दिलेल्या निर्देशनानुसार नोंदणीकृत बांधकाम कामगार हा जर वयाच्या 50 वर्षानंतर मरण पावल्यास त्याच्या वारसास 2 लाख रूपये तातडीची मदत दिले जाते.परंतु अटी शर्ती लावून देणे हे त्या दुःखी कुटुंबीयाच्या दृष्टीने चूकीची व जाचक,हेळसांड करणारे आहे.कारण जन्म तेथे मृत्यू आहे व मरण हे न सांगता येणारे अढळ सत्य आहे. एखादा नोंदणीकृत कामगार वयाच्या 18 ते 50 वर्षाच्या आत मरण पावल्यास त्याचा कुटूंबातील सर्व सदस्यांना अनेक संकटांना समोरे जावे लागते कमवत्या व्यक्तीचा मृत्यु झाल्यानंतर त्याच्यावर अवलंबून असणारी त्यांचे कुटुंबातील वयोवृध्द आई वडील दुःखी व निराधार होतात अश्या वयोवृद्ध लोकांना नोंदणीकृत कामगारांच्या कार्डावर सर्व आरोग्य बाबतची सेवा शासकीय तसेच खाजगी रूग्णालयात मोफत मिळावेत.तशी सुविधा उपलब्ध करून द्यावी.तसेच
कामगारांच्या मृत्यूच्या वेळीचे वय पाहता त्याला अधिक काळ आपल्या कुटुंबाच्या सदस्यांच्यासाठी कमवता आले असते,त्याला आपल्या कुटुंबातील सदस्याचे पालन पोषण करता आले असते परंतु निसर्गाच्या नीतीने त्याला ते मुकावे लागते.अशा सर्व बाबींचा काळजीपूर्वक विचार करून गोरगरिब, श्रमिक, कष्टकरी कामगारांना धीर व आधार देण्यासाठी नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या मृत्यूनंतर ही त्यांच्या मुलांचे शिक्षण पूर्ण होईपर्यत मंडळाने शैक्षणिक, आर्थिक मदत करावी तसेच त्यांच्या कुटूंबियांना तातडीने दारिद्रय रेषाखालील पिवळे शिधापत्रिका मंजूर करण्यात यावे कारण कुटूंबाचा अन्नधान्या विना जेवणासाठी आबाळ होवू नये. यांची दक्षता घ्यावी.
नोंदणीकृत कामगारांचा मृत्यू झाल्यावर कोणतीही वयाची अट न लावता सरसकट त्यांच्या वारसास "दोन लाख रूपये " विनाअटी व शर्ती न लावता, तातडीची आर्थिक मदत करावी. अशी मागणी आम्ही अखिल महाराष्ट्र कामगार - कर्मचारी संघ,महाराष्ट्र राज्य.सांगली जिल्हा मार्फत करत आहोत.तरी आपण सदरची कामगारांच्या हिताची मागणी मान्य करावी.
यावेळी,अखिल महाराष्ट्र कामगार - कर्मचारी संघ,महाराष्ट्र राज्य सांगली जिल्हाध्यक्ष मा.संजय भूपाल कांबळे,जनरल सेक्रेटरी मा.संजय संपत कांबळे,सेवक आरोग्य कामगार संघटना.महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.उमरफारूक ककमरी,जिल्हा महासचिव मा.अनिल मोरे,जिल्हा सदस्य मा.वसंत भोसले,मिरज तालुकाध्यक्ष मा.अस्लम मुल्ला,आटपाडी तालुकाध्यक्ष मा.आबासो काटे,मा.अनिल अंकलखोपे,शिद्धार्थ कांबळे,संगाप्पा शिंदे,वसंत गाडे,बंदेनवाज राजरतन,आनंदा गाडे,दिपक कांबळे,अरूण सर्जे,दऱ्याप्पा कांबळे,युवराज कांबळे, विक्रांत सादरे,शिवकुमार वाली,गणेश पाटील,शंकर सुर्यवंशी,राजेंद्र पवार,विक्रांत सादरे,जावेद अलासे,यांच्या बरोबरच मोठ्या संख्येने कामगार कर्मचारी उपस्थित होते.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆