yuva MAharashtra मोठी बातमी ---- पुढील तीन महिने वीज तोडणी थांबवण्याचा निर्णय..... ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी विधानसभेत केली घोषणा.....

मोठी बातमी ---- पुढील तीन महिने वीज तोडणी थांबवण्याचा निर्णय..... ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी विधानसभेत केली घोषणा.....





मोठी बातमी ----  
        
 पुढील तीन महिने वीज तोडणी थांबवण्याचा निर्णय.....

ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी विधानसभेत केली घोषणा.....

======================================


======================================

मुंबई | ता.१५ मार्च २०२२

 शेतकऱ्यांची वीज तोडणी  प्रकरणावरुन अधिवेशनात आज विरोधकांनी जोरदार गदारोळ घातला. वीज तोडणीच्या मुद्द्यावरुन आज विधानसभेत विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सरकारला धारेवर धरत म्हंटले " चर्चा नको.. निर्णय करा.." रोज शेतकरी आत्महत्या होत असताना  सावकारी वसुली सुरू आहे. विज तोडणे बंद करा , ही सर्वांची भावना आहे. आताच्या आता घोषणा करा. तोवर कोणतेही कामकाज करू नका. प्रत्येक अधिवेशनात केवळ चर्चा आणि घोषणा कसल्या करता..? त्यातील एकही घोषणा पाळली जात नाही. रोज शेतकरी आत्महत्या करतो आहे. आम्हाला श्रेय नको, हवे तर सत्ताधारी पक्षाची मागणी समजा. पण तातडीने निर्णय जाहीर करा. वीज तोडणे बंद करा आणि शेतकऱ्यांना तातडीने दिलासा द्या.. अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी लावून धरली होती.
यानंतर विधानसभेत ऊर्जामंत्री नितीन राऊत  यांनी एक मोठी घोषणा करत शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.  वीज पुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांची वीज जोडणी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच थकबाकीपोटी शेतकऱ्यांच्या हातात पीक येईपर्यंत आगामी तीन महिने कृषी वीज ग्राहकांची वीज तोडणी आम्ही तात्पुरत्या स्वरुपात थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.
शेतकऱ्यांची वीज तोडणी आम्ही थांबवत आहोत. वीज ग्राहकांना विनंती आहे... आम्ही सवलती देत असलो तरी तुम्ही तुमची बिले वेळेवर भरा असंही ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी म्हटलं आहे.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆



◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆