yuva MAharashtra बांधकाम कामगारांच्या विविध सांस्कृतिक कार्यासाठी आणि मुलांच्यासाठी सर्व सोयीयुक्त शैक्षणिक वस्तीगृह सहीत जिल्हाच्या मध्यवर्ती ठिकाणी "बांधकाम कामगार सांस्कृतिक भवन" उभारण्यात यावे... अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघाचे सांगली जिल्हाध्यक्ष संजय कांबळे यांची मागणी...

बांधकाम कामगारांच्या विविध सांस्कृतिक कार्यासाठी आणि मुलांच्यासाठी सर्व सोयीयुक्त शैक्षणिक वस्तीगृह सहीत जिल्हाच्या मध्यवर्ती ठिकाणी "बांधकाम कामगार सांस्कृतिक भवन" उभारण्यात यावे... अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघाचे सांगली जिल्हाध्यक्ष संजय कांबळे यांची मागणी...



बांधकाम कामगारांच्या विविध सांस्कृतिक कार्यासाठी आणि मुलांच्यासाठी सर्व सोयीयुक्त शैक्षणिक वस्तीगृह सहीत जिल्हाच्या मध्यवर्ती ठिकाणी "बांधकाम कामगार सांस्कृतिक भवन" उभारण्यात यावे...

अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघाचे सांगली जिल्हाध्यक्ष संजय कांबळे यांची मागणी...

=====================================
=====================================

सांगली |दि. २ मार्च २०२२

आद.ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या अखिल महाराष्ट्र कामगार - कर्मचारी संघ,महाराष्ट्र राज्य,सांगली जिल्हा मार्फत,सहाय्यक कामगार आयुक्त मा.अनिल गुरव साहेब यांचे कार्यालयातील प्रमुख अधिक मा.सुरेश लोहार साहेब यांच्या कडे मागणीचे निवेदन देण्यात आले,त्या निवेदन द्वारे मा.मुख्यमंत्री सो तसेच मा.कामगार मंत्री सो यांना प्रामुख्याने मागणी करण्यात आली.त्यानुसार असे सांगितले की,महाराष्ट्र शासनाने बांधकाम कामगारांचे राहणीमान सुधारावी तसेच त्यांच्या मुलांना उच्च दर्जाचे शिक्षण घेता यावे म्हणून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ,मुंबई यांच्या मार्फत विविध कल्याणकारी योजना अंमलात आणलेल्या आहेत. त्यांमुळे श्रमिक कष्टकरी बांधकाम  कामगार हा आपल्या मुलांना चांगल्या दर्जाचे उच्च शिक्षण देऊन मुले मोठा अधिकारी व भारत देशाचा चांगला नागरिक व्हावेत यासाठी अतोनात प्रयत्न करीत आहे.
परंतु महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात ग्रामीण भागातून तसेच शहरातील विस्तार भागातून जिल्हाच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या बांधकाम कामगारांच्या मुलांना राहण्याची गैरसोय होत आहे. जिल्हा ठिकाणच्या हॉस्टेलला वर्षाचा लाखो रूपयांचा खर्च श्रमिक बांधकाम कामगारांना न पेलणारा असल्याने त्यांना मुलांच्या शिक्षणासाठी राहण्यास मिळेल त्या दराने  व्याजाचे पैसे घेऊन वस्तीगृह व हॉटेल यांचे पैसे भागवावे लागत आहेत. शैक्षणिक मोठ्या खर्चाच्याच सोबत हा अतिरिक्त खर्चाची व्यवस्था करावी लागत आहे. परिणामी हा बांधकाम कामगार कर्जबाजारी होत चालेला आहे. तसेच तो स्वतः काबाडकष्ट करून मोठ मोठे कार्यालय,हॉल,भवन बांधतो मात्र त्यांच्या मुलीचे,मुलाचे लग्न तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम करण्यासाठी हॉल कार्यालय मिळत नाही.खर्च वा भाडे जास्त व न परवडणारे असल्याने हॉल कार्यालयात कार्यक्रम घेणे बांधकाम कामगार शक्य नाही. त्यांमुळे आम्ही अखिल महाराष्ट्र कामगार - कर्मचारी संघ,महाराष्ट्र राज्य.सांगली जिल्हा यांच्या मार्फत आपणास विनंती करीत आहोत की,महाराष्ट्र  इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ,मुंबई यांच्या कडे बांधकाम कामगाराचा हक्काचा जमा झालेल्या निधी मधून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाच्या मध्यवर्ती ठिकाणी बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी हक्काचे सर्व सोयीयुक्त शैक्षणिक वस्तीगृहसह "बांधकाम कामगार सांस्कृतिक भवन" बांधून   महाराष्ट्रातील सर्व बांधकाम कामगारांच्या कुटुंबीयाच्या शुभेच्छा घ्याव्यात अशा मागणीचे निवेदन सहाय्यक कामगार आयुक्त यांना अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघाच्या वतीने देण्यात आले. सदर निवेदन प्रत माहिती साठी व आवश्यकत्या कार्यवाही साठी मा.पालक मंत्री सो,मा.प्रधान सचिव सो.कामगार विभाग,मा.कामगार आयुक्त सो.मुंबई,मा.सचिव तथा मुख्यकार्यकारी अधिकारी सो(BOC),मा.अप्पर कामगार आयुक्त सो.पूणे विभाग यांच्या बरोबरच मा.जिल्हाधिकारी सो.सांगली यांना ईमेल द्वारे पाठविले आहे.
यावेळी अखिल महाराष्ट्र कामगार - कर्मचारी संघ,महाराष्ट्र राज्य सांगली जिल्हाध्यक्ष मा.संजय भूपाल कांबळे,जनरल सेक्रेटरी मा.संजय संपत कांबळे,आरोग्य कर्मचारी संघटनेचे महासचिव मा.अनिल मोरे,मिरज शहर अध्यक्ष मा.अस्लम मुल्ला,जिल्हा सदस्य मा.वसंत भोसले,मा.अनिल अंखलखोपे,मा.युवराजभाऊ कांबळे, मा.विक्रांत सादरे,मा.दिलीप गाडे,मा.शिवकुमार वाली यांच्या बरोबरच आयु.गणेश पाटील, आयु.शंकर पवार,राजेंद्र सुर्यवंशी,आयु.जावेद आलासे,इसाक सुतार,चंद्रकांत कांबळे अदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆



◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆