भिलवडी शिक्षण संस्थेच्या इंग्लिश मिडीयम स्कूल, मध्ये मराठी राजभाषा दिन व विज्ञान दिन मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा..
==============================
==============================
भिलवडी |ता. ०२ / ०३ / २०२२
भिलवडी शिक्षण संस्थेच्या इंग्लिश मिडीयम स्कूल, मध्ये मराठी राजभाषा दिन व विज्ञान दिन मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला.
यावेळी के.जी.सेक्शन मधील ज्युनिअर के.जी. व मिनी के. जी. मधील सर्व मुले पारंपारिक वेशभूषेत आली होती तसेच मुलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातील विविध लोकगीते सादर करण्यात आली.व त्याचबरोबर विज्ञान दिनाचे देखील औचित्य साधून विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. सिनियर के. जी. मधील विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनात मोठ्या उत्साहात व आनंदात सहभाग घेतला.
विज्ञानाच्या प्रतिकृती आणि त्यावर आधारित प्रयोगांचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांनी करून दाखवले. अशा अनेक प्रयोगांचे प्रात्यक्षिक मुलांनी स्वतः करून त्याची माहिती सांगितली.
यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रयोगांचे पालकांनी कौतुक करत शाळेने सुरू केलेल्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमासाठी विभागाचे विभाग प्रमुख श्री. के.डी.पाटील सर
व सर्व पालकांची उपस्थिती लक्षणीय होती. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.स्मिता माने व सर्व शिक्षकवृंद व सेवक वर्ग उपस्थित होते.