yuva MAharashtra आर.पी.आय.(आठवले) मिरज शहर यांचे वतीने जागतिक महिला दिन उत्साहाने साजरा.

आर.पी.आय.(आठवले) मिरज शहर यांचे वतीने जागतिक महिला दिन उत्साहाने साजरा.



आर.पी.आय.(आठवले) मिरज शहर यांचे वतीने जागतिक महिला दिन उत्साहाने साजरा...

======================================
======================================

मिरज | ता. ०८ / ०३ / २०२२

आज ०८ मार्च जागतिक महिला सन्मान दिन. या निमित्ताने आज रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया(आठवले) मिरज शहर यांचे वतीने उत्साहाने व आनंदाने साजरा करणेत आला.

प्रथमतः पंढरपूर चाळ मिरज येथील महिलांना जागतिक महिला दिना निमित्त आर.पी.आय.चे मिरज शहर अध्यक्ष मा. अविनाश कांबळे व आय.टी. सेलचे सांगली जिल्हाध्यक्ष तथा सांगली शहर जिल्हा सचिव मा. योगेंद्र कांबळे यांच्या हस्ते महिलांना गुलाब पुष्प देऊन सन्मानीत करणेत आले.


यावेळी जागतिक महिला दिना निमित्त बोलताना मा. योगेंद्र कांबळे म्हणाले, आंतरराष्ट्रीय महिला दिन दरवर्षी ८ मार्च रोजी साजरा केला जातो. महिलांच्या सन्मानाचा, त्यांच्या उत्कर्षाचा दिवस म्हणजे महिला दिन.प्रत्येक क्षेत्रात आज महिला पुरुषांच्या बरोबरीने कार्यरत असून, आपल्या कर्तृत्त्वाने त्यांनी विविध क्षेत्रांत गगनभरारीही घेतली आहे.स्री म्हणजे वास्तव्य,स्री म्हणजे मांगल्य,स्री म्हणजे मातृत्व,स्री म्हणजे कतृत्व. स्वतःच अस्तित्व आपल्या स्वकर्तृत्वातून सिद्ध करणार्या महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.






यावेळी पंढरपूर चाळ वसाहत येथील महिलां सोबत, मा. जनाबाई लोंढे, मा. माधवी कांबळे, मा. शिलाताई साळूंखे, मा.शांताताई माने, मा. भारतीताई घंटे, मा. रुबीना शिकलगार, मा. रेखाताई कांबळे, मा. विजय कांबळे, मा. मनोज कांबळे, मा. अंकूश गोसावी, मा. संतोष कांबळे, मा. राजदिप यवारे यांचे सह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.



◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆





◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆