yuva MAharashtra राष्ट्रीय कृषी व ग्रामिण विकास बँक (नाबार्ड) सांगली व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. सांगली यांचे संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिना निमित्त भव्य महिला मेळावा संपन्न....

राष्ट्रीय कृषी व ग्रामिण विकास बँक (नाबार्ड) सांगली व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. सांगली यांचे संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिना निमित्त भव्य महिला मेळावा संपन्न....





राष्ट्रीय कृषी व ग्रामिण विकास बँक (नाबार्ड) सांगली व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. सांगली यांचे संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिना निमित्त भव्य महिला मेळावा संपन्न....

--------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------

सांगली | दि. 09 / 03 / 2022

नाबार्ड व सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक लि., सांगली यांचे संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिना निमित्त भव्य महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा  श्रीमती जयश्रीताई पाटील - उपाध्यक्षा सांगली जिल्हा मध्यवर्ती बैंक सांगली 
 मा. श्रीमती मनिषा दुबुले - अतिरिक्त पोलिस अधिक्षक, सांगली,
मा. श्री. धानोरकर साहेब - नाबार्ड DDM.
 मा. ॲड.सविता रोडबाडे मा.ॲड. जयश्री पेंडसे , मा. श्री. कडूसाहेब - सी ई. ओ. सांगली DCC बैंक , अनुराधा शिराळकर, स्नेहल कुलकर्णी यांची या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती लाभली.


उपस्थित मान्यवरांचे हस्ते दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी
 सौ. पियांका कणप-पाटील (उपाध्यक्षा , सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक) हेमा आडमुठे (Add. Sp. सांगली )  वर्षा पाटील (सांगली जिल्हा बार कॉन्सिलअसो. च्या पहिल्या महिला अध्यक्ष, अग्रणी फौजदारी वकील) सौ. सुचित्रा राजमाने यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
 मा. मनीषा दुबुले यांनी आत्ताची महिलांचे सबलीकरण परीस्थिती , महिला सक्षमीकरण , महिला सुरक्षितता आणि समाज या अनुषंगाने मार्गदर्शन केले. 

ॲड. जयश्री  मॅडम आणि ॲड. सविता मॅडम यांनी उपस्थित महिलांना आत्ताच्या सामाजिक समस्या निवारण आणि बचाव , महीलांसंदर्भातील गुन्हे आणि सावधानता या विषयांवर मूलभूत मार्गदर्शन केले. 



मा.जयश्री ताई पाटील यांनी बँकिंग क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व महिला पदाधिकारी व कर्मचारी , उद्योजक महिला , बँक सभासद महिला , बचत गट महिला यांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या दिल्या व उपस्थित सर्व महिलांना बँक व्यवहारा बाबतीत  मार्गदर्शन केले.
बँकांमार्फत कर्ज घेऊन यशस्वी उद्योग चालू असलेल्या माहीलांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रदर्शन स्टॉल व विक्रीची सोय करणेत आली होती.
 यशस्वी उद्योजक महिलांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र , ट्रॉफी व गुलाबपुष्प  देऊन सन्मान करण्यात आला.





या कार्यक्रमाचे ईशस्तवन सौ. एस. ए.पांडे शाखा महावीरनगर सांगली. यांनी केले. तर  स्वागत व प्रास्ताविक
सौ. प्रियांका कणप - पाटील आय टी विभाग, विभागप्रमुख यांनी केले. व सुत्रसंचालन अनुराधा शिराळकर व स्नेहल कुलकर्णी यांनी केले.सौ वासंती वांगीकर मॅडम यांनी आभारप्रदर्शन केले .वंदेमातरम् राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.अल्पोपहार आणि स्टॉल खरेदीचा महिलांनी आनंद घेतला.


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆



◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆