डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महामानव ह्या जगतातील अखिल मानवतेचे आदर्श आहेत. ज्यांनी आपले आयुष्य उपेक्षितांसाठी, दीनदुबळ्या जनतेसाठी, समतेच्या न्यायासाठी खर्च केले. गावकुसाबाहेर फेकून दिलेल्या माणसांचा विचार केला. धर्माच्या अंधाऱ्या खाईत गाडलेल्या माणसाला हात धरून वर काढले, स्वाभिमानी रक्त त्यांच्या धमन्या धमन्यांतून खेळविले आणि त्याला माणूस हे नाव दिले. म्हणूनच बाबासाहेबांना महामानव संबोधले जाते.
बाबासाहेबांनी समाजाच्या कल्याणासाठी, जगाच्या सुखासाठी आपला देह झिजविला. त्यांच्या कार्यामुळे मानवी समाजात क्रांती घडून आली. त्यांच्या ज्ञानामुळे, उच्च विचारांमुळे, तत्त्वज्ञानामुळे व त्यांनी दिलेल्या शिकवणीमुळे समाजात बदल झाला. दलित पीडित शिक्षित होऊन इतरांच्या बरोबरीने वागू लागला. आई-बहिणीला समाजात पुरुषांच्या बरोबरीचे स्थान मिळाले, त्यांनी लिहिलेल्या भारतीय संविधानामुळे अख्ख्या भारतीयांचेच नव्हे तर जगातील लोकशाही राष्ट्रांचे देखील भलेच झाले.
◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆
◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆