रमजान मुल्ला यांच्या संग्रहास नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार..
====================================
====================================
भिलवडी | दि. 20 एप्रिल 2022
नागठाणे ता.पलूस येथील कवी रमजान मुल्ला यांच्या "अस्वस्थ काळरात्रींचे दृष्टान्त" या कविता संग्रहाला कविवर्य नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे.नारायण सुर्वे साहित्य कला अकादमी नेरळ जि. रायगड यांच्या वतीने १ मे रोजी नेरळ येथे आयोजित पद्मश्री नारायण सुर्वे कव्याजगर संमेलनात मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे.
रमजान मुल्ला यांच्या संग्रहाला हा तिसरा राज्यस्तरीय पुरस्कार मिळतो आहे. या आधी त्यांच्या कविता मुंबई विद्यापीठाच्या बी.ए. भाग तीन साठी अभ्यासात होत्या. शिवाय "काळजातल्या कविता" या कार्यक्रमाच्या माध्यमातून ते महाराष्ट्रभर परिचित आहेतच. चंद्रपूर व सांगली येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात निमंत्रित कवी म्हणून त्यांचा सहभाग होता. भारतीय भाषांमधील कवितांचा परदेशात विद्यापीठ स्तरातून अभ्यास व्हावा यासाठी निर्मिलेल्या एशियन पोएट्री मध्ये वेचून निवडलेल्या देशातल्या मोजक्या कवींच्या कवितांमधून रमजान मुल्ला यांच्या कवितांची निवड झाली आहे.डॉ साहेब खंदारे यांनी या कवितांचा इंग्रजी अनुवाद केला आहे. लवकरच त्यांच्या "अस्वस्थ काळरात्रींचे दृष्टान्त" या पुस्तकाची कन्नड आवृत्ती देखील वाचकांच्या हाती येईल.
==============================
====================================