yuva MAharashtra सुरेंद्र भैय्या वाळवेकर यांच्या प्रयत्नातून माळवाडी गावासाठी बावीस लाख पंचवीस हजार रुपयांचा निधी मंजूर : खासदार संजय काका पाटील यांची विषेश मदत

सुरेंद्र भैय्या वाळवेकर यांच्या प्रयत्नातून माळवाडी गावासाठी बावीस लाख पंचवीस हजार रुपयांचा निधी मंजूर : खासदार संजय काका पाटील यांची विषेश मदत



सुरेंद्र भैय्या वाळवेकर यांच्या प्रयत्नातून माळवाडी गावासाठी बावीस लाख पंचवीस हजार रुपयांचा निधी मंजूर : खासदार संजय काका पाटील यांची विषेश मदत 

=====================================


=====================================

भिलवडी |25 / 04 / 2022

      माळवाडी तालुका पलूस येथे जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र भैय्या वाळवेकर यांच्या विशेष प्रयत्नातून 22 लाख 25 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला यासाठी खासदार संजय काका पाटील यांनी विशेष मदत केली ह्या निधीतून रस्ते डांबरीकरण करण्यात येणार आहे.
                    श्री 1008 भ. सु पार्श्वनाथ दिगंबर जिनमंदिर व मानस्तंभ शिखरोपरी पंचकल्याणक प्रतिष्ठा महामहोत्सवम एवम विश्वशांती महायाग आराधना 2022  ही पूजा 3 तारखेला माळवाडी येथे होणार आहे ह्या पूजेसाठी येणाऱ्या श्रावक श्रविका रस्त्यावरून ये-जा करण्यासाठी गैरसोय होऊ नये म्हणून तातडीने बावीस लाख पंचवीस हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला यामध्ये रस्ते डांबरीकरण करणेसाठी हा निधी उपलब्ध वाळवेकर यांनी केला आहे  
      यामध्ये माळवाडी - वसगडे रोड ते सुनील चिंचवडे घर रस्ता डांबरीकरण करणे 10 लाख रुपये , माळवाडी शिवाजीनगर अंतर्गत  महेश वाळवेकर घर ते भालचंद्र सकळे घरापर्यंत रस्ता डांबरीकरण करणे 6.25 लाख रुपये,  शिवाजीनगर  माता बाल संगोपन केंद्र जाधव सर घर ते बाळू माळी घरापर्यंत रस्ता डांबरीकरण करणे 6 लाख रुपये ह्या कामासाठी हा निधी मंजूर करण्यात आला. 

            सुरेंद्र भैय्या वाळवेकर यांनी जिल्हा परिषदचा  स्विय निधी व 15 वित्त आयोगातून  पंचकल्याण पूजेसाठी नागरिक ये -जा करणार म्हटल्यावर तातडीने हा निधी मंजूर करुन पंचकल्याण पूजेसाठी श्रावक श्रविका यांना त्रास होऊ नये यासाठी हा निधी मंजूर केला आहे. सुरेंद्र वाळवेकर यांनी आतापर्यंत माळवाडी भिलवडी व जिल्हा परिषद गटांमध्ये कोट्यावधीचा  विकास केला आहे. निधी खेचून आणला आहे व शेवटच्या टप्प्यात 
22 . 25 लाखाचा माळवाडी ला निधी देऊन श्रावक श्रविकासाठी हा प्रयत्न केला आहे. यामुळे माळवाडीतील नागरिकांच्या मध्ये आनंदाचे वातावरण आहे. ते काम तातडीने सुरू केले आहे. लवकरच काम पूर्ण करतील तीन तारखेला पंचकल्याण पूजा आयोजित केली असून या पूजेसाठी जिल्ह्यातून श्रावक श्रविका येत असतात या सर्वांंचा विचार करता वाळवेकर यांनी हा निधी उपलब्ध केला आहे.

     याविषयी सुरेंद्र वाळवेकर म्हणाले या कामाचे ई टेंडर करून शासकीय नियमाप्रमाणे सर्व बाबींची पूर्तता करून वर्कऑर्डर घेऊन या कामास सुरुवात केलेली आहे. हे काम लवकरच पूर्ण होईल व येथे तीन तारखेला पंचकल्यान पूजा माळवाडी येथे होणार आहे. यामध्ये श्रावक श्रविका ये-जा करण्यासाठी कोणताही त्रास होऊ नये यासाठी हा निधी उपलब्ध केला आहे. अशी माहिती सुरेंद्र भैय्या वाळवेकर यांनी दिली.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆



◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆