सुभाष कवडे लिखित " हिरवी हिरवी झाडे " या बालकविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा संपन्न..
सुभाष कवडे यांचे साहित्य मुलांचे मनोरंजन व मुलांच्या मनावर सुंदर संस्कार करते.....
गिरीश चितळे,
=====================================
=====================================
भिलवडी | ता. ३ एप्रिल २०२२
सुभाष कवडे यांचे साहित्य मुलांचे मनोरंजन तर करतेच त्याचबरोबर, मुलांच्या मनावर सुंदर संस्कार देखील करते.मुलांचे भावविश्व समृध्द करणारी हिरवी हिरवी झाडे हे बालकवितांचे पुस्तक मुलांच्या हाती देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन भिलवडी सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष व उद्योगपती गिरीश चितळे यांनी केले.
सार्वजनिक वाचनालय भिलवडी येथे आयोजित वाचक,सभासद स्नेह मेळावा,देणगी दारांचा सत्कार व सुभाष कवडे लिखित " हिरवी हिरवी झाडे " या बालकविता संग्रहाच्या प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते.सांगली जिल्हा परिषदेचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड,उद्योजक रमाकांत मालू,मकरंद चितळे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.
भिलवडी सार्वजनिक वाचनालयास पन्नास खुर्च्या देणगी रूपाने भेट दिल्या बद्दल समृध्दी उद्योग समूहाचे रमाकांत मालू,गिरीश चितळे,मकरंद चितळे यांचा वाचनालयाच्या वतीने ग्रंथ भेट देवून सत्कार करण्यात आला.
भिलवडी गावचे सुपुत्र मोहन गायकवाड यांची सांगली जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी पदी निवड झालेबद्दल अभिनंदन पर सत्कार करण्यात आला.
यापुढे बोलताना गिरीश चितळे म्हणाले की,वाचन चळवळ वृद्धिंगत होण्यासाठी भिलवडी सार्वजनिक वाचनालय सातत्याने विविध उपक्रम राबवित आहे.त्यास वाचक,सभासद,
देणगीदार व ग्रामस्थां कडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे.
शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी सुभाष कवडे यांची कविता जीवनाला दिशा देणारी असून हा कवितासंग्रह बालकांसाठी पर्वणी ठरेल.तसेच भिलवडी सार्वजनिक वाचनालयात सुरू असलेल्या स्पर्धा परीक्षा विभागास ग्रंथ भेटीसह विविध पातळीवर सहकार्य करण्याचे जाहीर केले.
हिरवी हिरवी झाडे या पुस्तकाचा परिचय शरद जाधव यांनी करून दिला.हे पुस्तक मुलांच्या बरोबरीने प्रौढांनी सुद्धा वाचावे इतके संस्कारक्षम आहे.निसर्गाशी नातं जोडणारी,आनंद निर्माण करणारी कविता वाचकाला आत्मिक बळ देते असे सांगून शरद जाधव यांनी या पुस्तकातील दोन कवितांचे बहारदार असे वाचन केले.
वाचन कट्टा या उपक्रमांतर्गत माझे प्रेरणादायी वाचन या विषयांवर संजय पाटील यांनी नापास मुलांची गोष्ट या पुस्तकावर भाष्य केले.
प्रास्ताविक व स्वागत - डी.आर.कदम, सूत्रसंचालन सुभाष कवडे यांनी केले तर आभार हणमंत डिसले यांनी मानले.
यावेळी जी.जी.पाटील,
भू.ना.मगदूम,जे.बी.चौगुले,
डॉ.भालचंद्र कुलकर्णी, ए.के.चौगुले,
संजय कदम,आदींसह वाचक,सभासद,ग्रामस्थ,वाचनालयाचा सेवक वर्ग व पत्रकार उपस्थित होते.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆