yuva MAharashtra मुलांना सकारात्मक विचार करायला शिकवा व चांगले संस्कार करा - सौ. मनिषा पाटील

मुलांना सकारात्मक विचार करायला शिकवा व चांगले संस्कार करा - सौ. मनिषा पाटील



मुलांना सकारात्मक विचार करायला शिकवा व चांगले संस्कार करा - सौ. मनिषा पाटील 

======================================


======================================
 
भिलवडी | दि. 30/04/2022

भिलवडी शिक्षण संस्थेच्या इंग्लिश मिडियम स्कूल, भिलवडी मध्ये शनिवार दि. ३०/०४/२०२२ रोजी सिनियर के.जी. वर्गातील विद्यार्थ्यांचा प्रोग्रेस कार्ड डिस्ट्रिब्युशन (निकाल पत्रक वितरण ) समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे सौ. मनिषा भगवान पाटील - सहाय्यक शिक्षक सेकंडरी स्कूल ॲड ज्युनिअर कॉलेज भिलवडी यांनी वरील उदगार  काढले.यावेळी अध्यक्षपदी  मा.के. डी पाटील सर- सहसचिव भिलवडी शिक्षण संस्था, कु. विद्या टोणपे- मुख्याध्यापिका इंग्लिश प्रायमरी ॲड हायस्कूल भिलवडी  


     यावेळी  प्रमुख पाहुणे पुढे म्हणाल्या की, मुलांच्या अभ्यासाबरोबरच शारिरीक जडणघडण योग्य होणे गरजेचे आहे त्यासाठी मुलांना पारंपारिक खेळ खेळण्यास प्रवृत्त केले पाहिजे तसेच शक्यतो मुलांना मोबाईलपासून दूर ठेवावे,अशी त्यांनी पालकांना विनंती केली.
         यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. के. डी. पाटील सर अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले की, आजच्या कार्यक्रमातील पालकांची उत्स्फूर्त उपस्थिती पाहता त्यांनी पालकांना के.जी. मधील अनौपचारिक शिक्षणाबरोबरच इयत्ता १ ते १० पर्यंत आपल्या पाल्याच्या औपचारिक शिक्षणाकडे लक्ष देण्याचे आव्हान केले.
         या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. स्मिता माने मॅडम, सूत्रसंचालन व आभार सौ. पूनम कदम यांनी केले.  

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆



◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆