yuva MAharashtra मिरजेत मुस्लिम समाजाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती उत्साहात साजरी...

मिरजेत मुस्लिम समाजाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती उत्साहात साजरी...



मिरजेत मुस्लिम समाजाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती उत्साहात साजरी...

=====================================
=====================================

मिरज 
दि. १४ एप्रिल २०२२

विश्वरत्न, महामानव , क्रांतीसुर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त मुस्लिम समाज मिरज शहराच्या वतीने अभिवादन करण्यात आले. शाहनवाज सौदागर (मिरचीशेठ) म्हणाले, बाबासाहेबांनी सर्व मानवजातीच्या कल्याणासाठी कार्य केले. वर्षानुवर्ष पिचलेल्या, रंजल्या गांजल्या समाजाला बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून माणूसकीचा हक्क बहाल केले. आज काही बुरसटलेले धार्मिक विचारांची लोक भारतीय संविधान बदलू पाहत आहेत. अश्या मनुवादी विचारांचा धिक्कार करून सर्व भारतीय समाजाचा उद्धार  करणाऱ्या, हक्क व संरक्षण देणारे भारतीय संविधान वाचवणे खूप गरजेचे आहे, तर आज बाबासाहेबांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त संविधान बचाव देश बचाव हा नारा देण्यात आला. यावेळी यासर सौदागर, मकसुद भादी, युनूस चाबुकस्वार, मेहबूब अली मनेर, जुबेर सतारमेकर, नजीर झारी, रफिक शेख, प्रकाश बनसोडे, विजय भोसले, सोहेल इनामदार, वासिम चाबुकस्वार, सलीम चाबुकस्वार, इलहाम मोमीन, महमद मुश्रीफ आदी उपस्थित होते.

●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●


●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●



●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●