कृष्णाकाठावरील सोयाबीनची फूल , फळ धारणा कितपत आहे याच्या टेस्ट रिपोर्ट शिवाय वितरित केलेले बियाणे शेतकऱ्यांना दिलेच कसे,
गेलेल्या प्लॉटची सत्वर पंचनामे करावेत असे आदेश शरद लाड यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांना दिले.
=====================================
=====================================
भिलवडी | ता. ७ एप्रिल २०२२
धनगाव (ता पलूस) येथे केडीएस 726 वाणाच्या सोयाबीन प्लॉट फुलकळीला ही आले नाहीत यामुळे यावर्षीचा सोयाबीन चा हंगाम वाया गेला आहे. संबंधित महाबीज कंपनीने या सर्व नुकसानीची जबाबदारी स्वीकारावी आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा. यासाठी शासनाने आपली सर्व यंत्रणा उभी करावी आणि आत्ताच कोरोना, महापुरातून सावरलेल्या शेतकऱ्यांची होणारी फसवणूक खपवून घेतली जाणार नाही, वेळ पडली तर रस्त्यावर उतरू पण या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले की, ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांनी तशा कृषी विभागाकडे तक्रारी द्याव्यात म्हणजे त्यावर कार्यवाही करणेत येईल.
यावेळी रमेश पाटील, दीपक भोसले, शरद साळुंखे, प्रदीप साळुंखे, अनिल साळुंखे, प्रकाश जाधव, श्रीकांत रोकडे, अशोक पाटील, श्रीकांत सावंत यांचेसह शेतकरी उपस्थित होते.
शरद लाड यांनी मोटरसायकलीवरून जाऊन प्रत्येक बाधित सोयाबीन क्षेत्राची पाहणी करून जाग्यावरूनच शासकीय यंत्रणा कामाला लावली..
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆