असंघटित कामगार नेहमी शासकीय सोयीसुविधा व योजना पासून दूरच राहिला आहे... साहित्यिक सुभाष कवडे
भिलवडी येथे असंघटित कामगारांच्या न्याय हक्कासाठी संघटनेचा शुभारंभ...
-------------------------------------------------------------------
-------------------------------------------------------------------
भिलवडी | दि. २ मे २०२२
भिलवडी येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून, कामगारांच्या न्याय हक्कासाठी असंघटित कामगार संघटनेची स्थापना करण्यात आली...
एक मे महाराष्ट्र दिन व कामगार दिन यानिमित्ताने परिसरामध्ये असणाऱ्या असंघटित कामगारांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळावा. या प्रमुख उद्देशाने शशिकांत कांबळे यांच्या संकल्पनेतून असंघटित कामगार संघटनेची स्थापना करण्यात आली. सकाळी साडे आठच्या सुमारास नामफलकाचे अनावरण करून, उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून असंघटित कामगार संघटनेचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी भिलवडी सारख्या मोठ्या गावांमध्ये विविध क्षेत्रातील असंघटित असणाऱ्या कामगारांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा या हेतूने सुरू करण्यात आलेल्या या संघटनेचे मान्यवरांनी कौतुक करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना सुप्रसिद्ध साहित्यिक सुभाष कवडे यांनी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या वक्तव्याचा दाखला देत सांगितले की, आण्णाभाऊ साठे म्हणतात पृथ्वी ही शेषनागाच्या फणावरती तोलली गेली नसून, ती कामगारांच्या तळहातावर तोलली गेली आहे... नेहमी कष्टामध्ये जीवन जगत असलेला हा असंघटित कामगार नेहमी शासकीय सोयीसुविधा व योजना पासून दूरच राहिला आहे. त्यांना त्याचा योग्य तो मोबदला मिळत नाही म्हणूनच भिलवडी मध्ये सुरु केलेला हा आगळा-वेगळा संघटन सोहळा कौतुकास्पद आहे. संघटनेने समन्वय साधून योग्य दिशेने वाटचाल केली पाहिजे.
भिलवडी व्यापारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रमेश पाटील यांनी आपल्या मनोगतामध्ये असंघटीत कामगार संघटीत झाला तर चांगले संघटन होवू शकते.एकी मे नेकीचा चांगला उपयोग होतो. विविध समस्यांवर तोडगा काढता येतो.या संघटनेच्या माध्यमातून कामगारांच्या हिताची योग्य ती माहिती व योजना कामगारांच्या पर्यंत पोहोचतील असा विश्वास व्यक्त केला.कामगाराला न्याय मिळाला पाहिजे.कामगार कुठेही गेला तरी त्याच्या पाठीशी कोणीतरी असले पाहिजे.संघटनेमुळे कामगारांची होणारी पिळवणूक व फसवणूक होणार नाही असे मत माजी सैनिक कुमार पाटील यांनी व्यक्त केले.तत्पूर्वी संकल्पना प्रमुख शशिकांत कांबळे व अध्यक्ष सचिन मोकाशी यांनी उपस्थित मान्यवरांना संघटना स्थापनेचा उद्देश व संघटनेची ध्येय धोरणे या विषयी माहिती दिली.यावेळी माजी सैनिक,प्रकाश चौगुले, उत्तम कांबळे (भोई),कयुम पठाण,कुंडलीक कोळी, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुबोध वाळवेकर, जेष्ठ नागरिक रामचंद्र उर्फ बाळासाहेब शेटे, सुनिल माने, घनश्याम रेळेकर,
यांच्यासह संघटनेचे उपाध्यक्ष शरद कुरणे, सचिव दत्तात्रय गंगणे, कार्याध्यक्ष रवि माळी, नितिन कांबळे यांच्यासह संतोष नवले, रोहित मदने,अतिश शिखरे आदी जनसंपर्क प्रमुख यांच्यासह महिला कामगार सदस्या व ग्रामस्थ उपस्थित होते.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆