भौतिक सुविधांची रेलचेल म्हणजे समाधान नाही तर साभोवतालच्या माणसांच्या सुखदुःखात सहभागी होऊन जीवनाचा खरा आनंद उपभोगता येतो...प्रा.सूरज चौगुले
====================================
====================================
भिलवडी | दि. 13 / 05 / 2022
भौतिक सुविधांची रेलचेल म्हणजे समाधान नाही तर साभोवतालच्या माणसांच्या सुखदुःखात सहभागी होऊन जीवनाचा खरा आनंद उपभोगता येत असल्याचे प्रतिपादन प्रा.सूरज चौगुले यांनी केले.भिलवडी ता.पलूस येथील सार्वजनिक वाचनालयाच्या ८२ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित व्याख्यानमालेत ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी उद्योगपती मकरंद चितळे होते.
यापुढे बोलताना डॉ.सूरज चौगुले म्हणाले की,आजकाल टेलिव्हिजन वरील वरील विकृत विचारांच्या मालिकेतील जीवन शैलीची गोडी लोकांना लागली आहे.या मालिका भारतीय संस्कृतीला छेद देत असून कुटुंबातील ऐक्य , एकोपा , जिव्हाळा नष्ट होत आहे.
ग्रंथदालनातर्फे आयोजित पुस्तक प्रदर्शनाचे
प्रमोद कुलकर्णी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
वाचनालयाचे अध्यक्ष गिरीश चितळे,कार्यवाह सुभाष कवडे आदींसह वाचक सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डी.आर.कदम यांनी प्रास्ताविक व स्वागत केले,जयंत केळकर यांनी पाहुणे परिचय केला, हणमंत डिसले यांनी आभार मानले.
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●