yuva MAharashtra पावसामुळे आजचे कुंडल येथील सुप्रसिद्ध मोटिवेशनल व्याख्याते प्रा. गणेश शिंदे यांचे "जीवन सुंदर आहे" व्याख्यान रद्द..

पावसामुळे आजचे कुंडल येथील सुप्रसिद्ध मोटिवेशनल व्याख्याते प्रा. गणेश शिंदे यांचे "जीवन सुंदर आहे" व्याख्यान रद्द..



पावसामुळे आजचे कुंडल येथील सुप्रसिद्ध मोटिवेशनल व्याख्याते प्रा गणेश शिंदे यांचे " जीवन सुंदर आहे " व्याख्यान रद्द..

======================================


======================================

कुंडल | दि. 20 मे 2022

थोर स्वातंत्र्यसेनानी क्रांतिवीर कॅप्टन रामभाऊ लाड यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने कुंडल येथील 20 मे सायंकाळी 7 वाजता नियोजित असणारे सुप्रसिद्ध मोटिवेशनल व्याख्याते प्रा गणेश शिंदे यांचे
" जीवन सुंदर आहे " या महत्वपूर्ण विषयावरील जाहीर व्याख्यानाचा कार्यक्रम संततधार पावसामुळे रद्द करण्यात आल्याची माहिती रणसंग्राम सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष ॲड दीपक लाड यांनी दिली..

यावेळी त्यांनी कळवले
सुप्रसिद्ध व्याख्याते व ख्यातनाम लोकप्रिय युवा कीर्तनकार
प्रा गणेश शिंदे यांच्या कार्यक्रमाची उत्सुकता क्रांतिभूमी कुंडल सह परिसरामधील महिला वर्ग आबालवृद्ध, व तरुण पिढीमध्ये शिगेला पोहचली होती,

कुंडल येथील प्रेरणादाई कार्यक्रमाची तयारी देखील जोरदारपाने करत अंतिम टप्प्यात आली होती..

 
ॲड दिपक लाड 
परंतु आज सकाळपासूनच पडत असलेल्या संततधार अवकाळी पावसामुळे कार्यक्रम रद्द करावा लागत असल्याने रणसंग्राम सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष ॲड दिपक लाड  यांनी श्रोत्यांची दिलगिरी व्यक्त केली.

पावसाचे प्रमाण कमी झाल्या नंतर लवकरच पुन्हा काही दिवसांनी या कार्यक्रमाची नव्याने रूपरेषा जाहीर करत तारीख निश्चित करण्यात येईल असेही रणसंग्राम सोशल फाउंडेशन कुंडल यांच्याकडून कळविण्यात आले..

●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●



●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●