🖕🖕🖕🖕🖕🖕🖕🖕🖕🖕🖕🖕🖕🖕🖕🖕🖕
राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम - Full Speech
चॅलेंजर्स ग्रुप भिलवडी आयोजित
कृष्णाकाठ प्रीमियर लीग ( सिझन 7 )
स्व.डॉ.पतंगराव कदम (साहेब) स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यासाठी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांची उपस्थिती..
======================================
======================================
भिलवडी | दि. ३० मे २०२२
चॅलेंजर्स ग्रुपच्या वतीने आयोजित केलेल्या कृष्णाकाठ प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धेमध्ये मोरया स्पोर्ट्स सांगली संघाने विजेतेपद पटकावले. त्यांना डॉ.पतंगराव कदम स्मृती चषक आणि रोख 75 हजार रुपयांचे बक्षीस मिळाले.
दुसरा क्रमांक मार्दवी जिमखाना मायणी या संघाने पटकावला.त्यांना रोख 50 हजार आणि डॉ.पतंगराव कदम स्मृती चषक देण्यात आला.बक्षीस वितरण समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून राज्यमंत्री डॉ.विश्वजित कदम आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक महेंद्र अप्पा लाड उपस्थित होते.
स्पर्धेचे हे 28 वे वर्ष तर लीगचे 7 वे वर्ष आहे.
अंतिम सामन्याची सुरुवात राष्ट्रगीताने झाली.माजी मंत्री डॉ पतंगराव कदम यांना या वेळी अभिवादन करण्यात आले.
प्रथम फलंदाजी करताना मोरया स्पोर्ट्स सांगली संघाने निर्धारित 6 षटकांमध्ये तडाखेबंद 91 धावा केल्या. कर्णधार सुशील संकपाळ याने कर्णधाराला साजेशी खेळी करत 57 धावांची खेळी केली आणि त्याला श्याम एडकेने 29 धावा करत मोलाची साथ दिली.
उत्तरादाखल खेळताना मायणी संघ सांगली संघाच्या तिखट माऱ्यासमोर पूर्णपणे ढेपाळला.कर्णधार चेतन चिंचकर (29) आणि लखन सकट (13) यांनी थोडाफार प्रतिकार केला.निर्धारित 6 षटकांमध्ये मायणी संघाने 68 धावा केल्या.23 धावांनी विजय मिळवत सांगली संघाने विजेतेपदाला गवसणी घातली.सुशील बुर्ले याने 4 बळी मिळवले.
तिसरा क्रमांक गिरलिंग स्पोर्ट्स कवठेमहंकाळ संघाने पटकावला. त्यांना 25 हजार रुपये आणि डॉ.पतंगराव कदम स्मृती चषक देण्यात आला.
चतुर्थ क्रमांक कर्णवीर स्पोर्ट्स उपाळे संघाने मिळवला.त्यांना 10 हजार रुपये आणि डॉ.पतंगराव कदम स्मृती चषक देण्यात आला.
सामना संपल्यानंतर लगेचच बक्षीस वितरण समारंभ घेण्यात आला.
बक्षीस वितरण समारंभासाठी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी संयोजकांना, विजय संघांना शुभेच्छा दिल्या.अनेक चॅलेंजर्स ग्रुपच्या विविध उपक्रमांना यापुढेही मदत करण्याची ग्वाही दिली.
बक्षीस वितरण समारंभासाठी तहसीलदार निवास ढाणे, भिलवडीच्या सरपंच विद्या पाटील, उपसरपंच पृथ्वीराज पाटील, द.भा.सोसा.चे माजी चेअरमन बाळासो मोहिते,माजी सरपंच शहाजी गुरव,माजी उपसरपंच चंद्रकांत पाटील,तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष विलास पाटील,भिलवडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक कैलास कोडग, राजेंद्र मोहिते, बाळासाहेब मोरे,बाबासो मोहिते,महेश चौगुले, विकास यादव,राजेंद्र येसुगडे,विशाल मोरे, व्यापारी एकता असो.चे अध्यक्ष महेश शेटे, उपाध्यक्ष अशोक अष्टेकर,सचिव सचिन नावडे, खजिनदार दिलावर तांबोळी आणि सर्व संचालक उपस्थित होते.
अंतिम सामना ड्रोन कॅमेऱयाने शूटिंग करण्यात आला.
सामना पाहण्यासाठी सुमारे 10 हजार प्रेक्षक उपस्थित होते. सर्वच सामने पृथ्वीराज live च्या माध्यमातून यूट्यूब वरून थेट प्रक्षेपित करण्यात आले.सामन्याचे पंच म्हणून आकाश शितोळे आणि विशाल गुरव यान काम पाहिले.
समालोचनाची जबाबदारी प्रवीण मोहिते यांनी सांभाळली.
स्पर्धेमध्ये मॅन ऑफ दी सिरीजसाठी असलेला रेफ्रिजेटर मायणी संघाच्या चेतन चिंचकर याने मिळवला .
मॅन ऑफ दी मॅच साठी असलेल्या स्मार्ट वॉचचा मानकरी सांगली संघाचा कर्णधार सुशील संकपाळ ठरला.
सर्वोत्कृष्ट गोलंदाज सुशील बुरले आणि सर्वोत्कृष्ट फलंदाज आप्पासो पडळकर हे खेळाडू ठरले.सर्वाधिक षटकारासाठी असलेले चांदीचे कडे श्याम एडके याने मिळवले.
उदयोन्मुख खेळाडूंसाठी असलेले क्रिकेटचे किट शिराळा संघाच्या ओमकार जाधव याला देण्यात आले.
इतर वैयक्तिक बक्षिसे अशी-
उत्कृष्ट क्षेत्ररक्षक -
जाफर मोमीन सांगली
उत्कृष्ट यष्टीरक्षक -
सुधीर घाडगे उबाळे
सर्वोत्कृष्ट कर्णधार-
चेतन चिंचकर मायणी
शिस्तबद्ध संघ -
SK फायटर्स घाणंद
क्षणचित्रे
शेकडो हेलियम बलुन हवेत सोडून डॉ. पतंगराव कदम साहेबांना अनोख्या पद्धतीने अभिवादन करण्यात आले.
चॅलेंजर्स ग्रुपच्यावतीने प्रत्येक वर्षी एक सामाजिक उपक्रम राबवला जातो या वर्षीच्या स्पर्धेच्या निमित्ताने दोन मुलांना दत्तक घेण्यात आले. त्यांचा पूर्ण शैक्षणिक खर्च चॅलेंजर्स ग्रुपच्या वतीने करण्यात येणार आहे.यासाठी विश्वजीत कदम यांनीही 10 हजारांची मदत केली.
सामना पाहण्यासाठी सुमारे 10 हजार प्रेक्षकांनी गर्दी केली होती.प्रेक्षकांना बसण्यासाठी गॅलरीची व्यवस्थाही करण्यात आली होती.प्रत्येक चौकार षटकारासाठी प्रेक्षक देत असलेल्या प्रोत्साहनामुळे आणि उंडाळेच्या (जि.सातारा) हलगी पथकाने सामन्यांमध्ये रंगत आली.
सांगली जिल्ह्याच्या सर्व भागातून सामना पाहण्यासाठी खेळाडू उपस्थित होते.
जिल्ह्यातील सर्वात मोठी आणि नियोजनबद्ध स्पर्धा असे गौरवउद्गार त्यांनी काढले.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆