yuva MAharashtra डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया कडेगाव तालुका अध्यक्ष निवड संपन्न... अध्यक्षपदी वसंत तुपे यांची सर्वानुमते निवड

डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया कडेगाव तालुका अध्यक्ष निवड संपन्न... अध्यक्षपदी वसंत तुपे यांची सर्वानुमते निवड



डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया कडेगाव तालुका अध्यक्ष निवड संपन्न...

अध्यक्षपदी वसंत तुपे यांची सर्वानुमते निवड

====================================


====================================

कडेगाव (वांगी) | दि. 11/06/2022 

डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या कडेगाव तालुका अध्यक्षपदी शेळकबाव गावचे वसंत तुपे यांची हॉटेल महादेव येथे झालेल्या कार्यक्रमात एकमताने निवड करण्यात आली.
 त्यांच्या या निवडीने शेळकबाव गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
वसंत तुपे यांच्या निवडीने संपूर्ण तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या व ग्रामस्थांच्या शुभेच्छा मिळत आहेत.

मिळालेल्या अध्यक्ष पदाबद्दल तुपे बोलताना म्हणाले की, अनेक वर्षे पार्टीशी एकनिष्ठ राहून सर्वसामान्य जनतेसाठी केलेल्या कामाची पोच पावती म्हणावी लागेल तसेच इथून पुढेही पार्टी च्या पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सामान्य जनतेच्या हितासाठी नेहमी प्रयत्नशील राहीन असेही यावेळी तुपे म्हणाले,

या निवडीवेळी डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. सुकुमार कांबळे, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस संदीप ठोंबरे, सांगली जिल्हा अध्यक्ष विरु फाळके, निलेश कांबळे, शैलेश भिंगारदेवे,  विलास यादव, अंकुश आवळे, भारत ठोंबरे, नितीन कांबळे, जयवंत साठे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆