yuva MAharashtra भिलवडी ते पाचवामैल रस्त्याचे काम पुर्ण करा...अन्यथा तीव्र आंदोलन. माळवाडी खंडोबाचीवाडी भिलवडी स्टेशन ग्रामपंचायतींचे निवेदन...

भिलवडी ते पाचवामैल रस्त्याचे काम पुर्ण करा...अन्यथा तीव्र आंदोलन. माळवाडी खंडोबाचीवाडी भिलवडी स्टेशन ग्रामपंचायतींचे निवेदन...



भिलवडी ते पाचवामैल रस्त्याचे काम पुर्ण करा...अन्यथा तीव्र आंदोलन.
 
माळवाडी खंडोबाचीवाडी भिलवडी स्टेशन ग्रामपंचायतींचे निवेदन...

======================================


======================================

 भिलवडी | दि. 16/06/2022

  भिलवडी ते पाचवा मैल  येथील हायवे रस्त्याचे काम दोन वर्षे  रखडलेलं आहे त्यामुळं अपघात होण्याच प्रमाण वाढलं आहे.  या रस्त्यावरून खूप मोठया प्रमाणात वाहतूक आहे डीजेल पेट्रोलच्या गाड्या गॅसचे टॅंकर दुधाचे टॅंकर यांची वहातुक मोठि आहे. या रस्त्यावरुन वहातुक करणे अपघातास निमंत्रण ठरत आहे. शाळेच्या विद्यार्थीची गैरसोय होतं आहे या रस्त्याचे टोप ते भिलवडीपर्यंतचे काम पुर्ण झाले आहेत.   पावसाळ्यात हा परीसर कृष्णा नदिच्या महापुरास सामोरे जातो सर्व गांवे विस्थापित होतात त्यावेळी निर्माण होणाऱ्या अडचणी खुप त्रासदायक असतात. या अडचणीवेळी किमान रस्ते तरी चांगले असावेत. अशी अपेक्षा आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे जिल्हयात जितकी रस्त्याची क‍ामे सुरु आहेत ती अडचणी असतानासुद्धा पुर्ण झाली आहेत. या परीसात भिलवडी ते पाचवामैल या रस्त्याच्या कामादरम्यान कोणतिहि तांत्रिक अडचण नाहि. कोणिहि कोठेहि अडवणुक केलेली नाहि तरीसिद्धा  दोन वर्षात कसलीच प्रगती नाहि उलट आहे तो रस्ता उखडुन टाकल्यामुळे ग्रामस्थांना तसेच वहानधारकांना खुप त्रास सहन करावा लागत आहे.

या रस्त्याच्या बाजुसच या परीसरातील शाळा ,महाविद्यालये आहेत दोन दिवसात शाळा महाविद्यालाये सुरु होत आहेत आणि या शाळा महाविद्यालयासमोरचा रस्ताच उखडुन टाकला आहे हे मोठे धोकादायक आहे या शाळा मह‍विद्यालयासमोरचा रस्ता अती तातडीने पुर्ण करावा आणि विद्यार्थ्याना होणार्‍या अडचणींचे निराकरण करावे अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल. 

असा ईशारा माळवाडी खंडोबाचीवाडी भिलवडी स्टेशन  ग्रामपंचायतीच्यावतीने निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. 
याबाबतचे  निवेदन ईस्लामपुर सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले आहे यावेळी माजी पंचायत समिती सदस्य संताजी जाधव दत्ता उतळे विशाल शिंदे अक्षय पवार आदि उपस्थित होते.

◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆◆◆●◆●◆●◆




◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆