भिलवडी शिक्षण संस्थेच्या इंग्लिश प्रायमरी अँड हायस्कूल चे एस. एस.सी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश..
======================================
======================================
भिलवडी | दि. 21/06/2022
भिलवडी शिक्षण संस्थेच्या इंग्लिश प्रायमरी अँड हायस्कूल भिलवडी या शाळेचा मार्च २२ मध्ये झालेल्या एस.एस.सी बोर्ड परीक्षेचा निकाल १००% लागला. १००% निकालाची परंपरा सलग ८ वर्ष अखंडित राखली आहे.
कु. आरती भास्कर बाबर हिने ९८.४०% गुण मिळवून शाळेमध्ये प्रथम क्रमांक पटकाविला. तर
कु. वैष्णवी शशिकांत हजारे हिने ९७.६०% गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळविला.
कु. ईश्वरी अभय सकळे हिने ९६.६०% टक्के गुण मिळवून तृतिय क्रमांक मिळविला.
तसेच ९ विद्यार्थ्यांना ९०%च्या वरती गुण प्राप्त झाले आहेत. तसेच गणित या विषयांमध्ये शंभर पैकी शंभर गुण मिळवून आरती भास्कर बाबर हिने शाळेचे नाव उज्ज्वल केले . सर्व विद्यार्थ्यांना सर्व शिक्षकांचे चांगल्या प्रकारे मार्गदर्शन लाभले. एकूण २६ विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापिका कु. विद्या टोणपे व सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले. तसेच या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे भिलवडी शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून अभिनंदन करण्यात आले.
◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆
◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆