बुरुंगवाडी येथील ग्रामस्थांच्य मागणीला अखेर यश...
=====================================
=====================================
बुरुंगवाडी | दि. ०५/०६/२०२२
बुरुंगवाडी तालुका पलूस येथील ग्रामदैवत मसोबा देवालयाच्या जागेची शासकीय मोजणी मा.तहसिलदारसाहेब यांच्या मान्यनतेने, दिनांक ३ जून रोजी मोजणी अधिकारी,भूमि अभिलेख कार्यालय, पलूस, यांच्याकडून पार पडली.. गेल्या अनेक वर्षाच्या ग्रामस्थांची मागणी ग्रामपंचायत कार्यालय, बुरुंगवाडी यांचे कडून पूर्ण करण्यात यश आले.. यासाठी गावातील अनेकांनी गेली दोन वर्ष सातत्याने आपला बहूमोल असा वेळ दिला... पलूस भूमिअभिलेख कार्यालयाशी संपर्क राखत पाठ पुरवा केला..
सार्वजनीक ग्रामदैवत मसोबा देवालय जागा ही महाराष्ट्र शासन मालक सदरी असल्याने मा.तहसिलदार साहेब, मा.उपजिल्हाधिकारी साहेब यांना विनंती कामी अनेकांनी प्रयत्न व सहकार्य केले.. मा.उपजिल्हाधिकारीसाहेब व मा.तहसिलदार साहेब यांच्या आदेशने मोजणी होऊन हद्दीच्या खुणा निश्चित करण्यात आल्या. या साठी ग्रामपंचायत बुरुंगवाडी चे सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य ग्रामसेविका यांनी हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सातत्याने चर्चा घडवून प्रश्न तडीस लावण्याचा प्रयत्न केला..
याच बरोबर माजी ग्रामपंचायत सदस्य बाळासो जाधव, बाबुराव जाधव, संदीप जाधव, विनोद पाणबुडे, महेश (सचिन)जाधव, निलेश जाधव, संदीप कांबळे यांनीही मोजणी कार्यालयाकडे पाठपुराव करत आपला वेळ व योगदान दिले..
आज मोजणी हद्द कायम करते वेळी भिलवडी पोलीस स्टेशनचे सहकार्य मिळाले..
यावेळी उपसरपंच राजेश चव्हाण, सुनिल(बापू) जाधव, बाळासो फुटाणे, सतिश तावदर, सौ.रोहिणी कदम, ग्रामविकास अधिकारी सौ.संध्या माने व इतर ग्रामस्थ उपस्थित होते..
बुरुंगवाडी ग्रामस्थांकडून सरपंच, सौ.अस्मिता बनसोडे, उपसरपंच राजेश चव्हाण, सुनिल(बापू) जाधव व सर्व ग्रामपंचायत सदस्यांचं अभिनंदन केले जात आहे.लवकरात लवकर मसोबा देवालय परिसर अतिक्रमण मुक्त व्हावा आणि मसोबा देवालयाने मोकळा श्वास घ्यावा अशी ईच्छा ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे...
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆